pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

वक्तृत्वाची कला मुलांमध्ये निश्चितपणे विकसित होईल – भास्करराव अंबेकर

खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न - पांगारकर @ वक्तृत्व व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0 3 1 0 5 9
जालना/प्रतिनीधी,दि.15
वकृत्व ही एक कला असून स्पर्धेत भाग घेणाऱ्या
मुलांमध्ये ही कला निश्चितपणे विकसित होईल असा विश्वास शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी आज येथे बोलतांना व्यक्त केला.
जालना गणेश महासंघातर्फे आज रविवारी जुना जालना भागातील मुक्तेश्वर लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व आणि रांगोळी स्पर्धेच्या बक्षीस
वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जालना गणेश महासंघाचे अध्यक्ष अशोक पांगारकर, सिद्धिविनायक मुळे, दुर्गेश काठोठीवाले, सौ.शुभांगी देशपांडे, सौ.संध्या देठे, सौ.वैशालीताई पांगारकर, डॉ. शिवनंदा म्हेत्रे, सौ. जाधव, सौ.यशोमती पांगारकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना अंबेकर म्हणाले की, गणेश महासंघातर्फे यावर्षी अत्यंत चांगले उपक्रम राबवले असून या उपक्रमाबद्दल
त्यांनी महासंघाचे अध्यक्ष अशोक पांगारकर आणि त्यांच्या सर्व टीमचे मनापासून कौतुक केले. शब्दांचे महत्त्व संतांनी अभंगातून सांगितल्याचे विशद करून घरात सुद्धा युद्धाची भूमी तयार होऊ शकते इतकी ताकत शब्दात आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते स्व. प्रमोद महाजन हे उत्तम वक्ते होते. शाळा,महाविद्यालयीन पातळीवर होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातूनच ते
सामाजिक व राजकीय क्षेत्रात पुढे आले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्या भाषणाचे आपल्याला खूप आकर्षण होते असे
सांगून अंबेकर म्हणाले की, फर्डा वक्ता जर असेल तर त्याचा प्रभाव निश्चितच श्रोत्यांवर पडत असतो. जालना गणेश महासंघाच्या वतीने आयोजित
वकृत्व स्पर्धेत भाग घेणाऱ्या मुलांमध्ये देखील वक्तृत्वाची कला निश्चितपणे विकसित होईल असा विश्वास व्यक्त करून रांगोळी काढणे ही देखील एक कल्पकता असून रांगोळीतील नावीन्यपूर्ण कल्पक्तेमुळे प्रत्येकांच्या
घरातील वातावरणात प्रसन्नता निर्माण होते. विविध स्पर्धांच्या माध्यमातून महासंघाचे अध्यक्ष अशोक पांगारकर यांनी गणेश महासंघाचा जान आणल्याचे
अंबेकर म्हणाले. तत्पूर्वी सिद्धिविनायक मुळे यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जालना गणेश महासंघाचे अध्यक्ष अशोक
पांगारकर यांनी स्पर्धा आयोजित करण्यामागील भूमिका विषद केली. ते म्हणाले की, गणेशोत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून सामाजिक उपक्रम राबविने हा
देखील या उत्सवामागील उद्देश आहे. या उत्सवाला सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांची जोड देऊन जालनेकरांना चांगला संदेश देण्याचा प्रयत्न
जालना गणेश महासंघाच्या माध्यमातून करण्यात आला. विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेला चालना मिळावी, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून भविष्यात देखील अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल अशी ग्वाही पांगारकर यांनी शेवटी दिली. यावेळी वक्तृत्व आणि रांगोळी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना उपस्थीत
मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, स्मृती चिन्ह आणि रोख बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.जयश्री वाढेकर, प्रा. सीमा सरपोतदार, प्रा.जालिंदर बटूळे, प्रा.चंद्रकांत धोत्रे, श्रीकांत चिंचखेडकर, राजेंद्र बावकर, श्रीमती मेघा जोशी यांनी तर
रांगोळी स्पर्धेचे परीक्षण अरविंद देशपांडे आणि विजया कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. आर. जोशी यांनी तर शेवटी आभार शिवराज जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय आटोळे, रामदास कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास स्पर्धक, पालक, शिक्षक आणि जालना गणेश महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 0 5 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
06:15