जालना शहरातील नयाबाजार येथील रंगगाड्याची 126 वर्षाची परंपरा असलेला रंगगाडा होळीच्या दिवशी 13 मार्च रोजी शहरातील विविध भागातून मार्गक्रम झाला. या रंगगाड्याची सुरूवात नया बाजार, भैरवनाथ मंदिर पासुन झाली. हा रंगगाडा जेथून गेला, तेथून होळी खेळण्यास सुरूवात झाली.हा रंगगाडा नया बाजार, शौला चौक, बालाजी गल्ली, अकेली मस्जीद, नाथबाबा गल्ली, बडी सडक, श्रीराम मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मुर्तीबेस, काद्राबाद, सराफा, फुलबाजार नंतर नया बाजार येथे मिरवणुकीची सांगता झाली. या रंगगाडा समितीचे अध्यक्ष राजेंद्र सारस्वत यांच्यासह रंगगाड्याचे प्रमुख व मार्गदर्शक कैलासचंद्र भरतीया, कालुराम अग्रवाल, ओमप्रकाश सारस्वत, सुशिल गौड, राजेंद्र भरतीया, नरेंद्र मित्तल, ओमप्रकाश भारुका, अशोक मिश्रा, रुपेश राठी, संतोष राठी, अमित भरतीया, बबन भरतीया, विनय जैन, देवेंद्र भुरेवाल, महेश भक्कड, राहुल वझे, शरद बगडिया, शैलेश शर्मा, हनुमानप्रसाद भारुका, नंदकिशोर अग्रवाल, मुन्ना फतेपुरीया, अमित गुप्ता, सत्यनारायण कामड, शंकर खत्ती, पंकज गौड, शैलेश देविदान, चंपालाल भगत, संतोष खंडेलवाल, मयुर अग्रवाल, शिवरतन करवा, विघ्नेश तवरावाला, अजय गुप्ता, शरद बगडीया, राजेश लाहोटी, अरूण लाहोटी, सोनू दुसाने, अॅड. सागर अग्रवाल, दिपक भारूका, चंदन मिश्रा, किशोर भारूका, अनिल पंच, मोहन निमोदीया यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदविला. सदर बाजार पोलिसांनी मिरवणूकीत चोख बंदोबस्त ठेवला होता. याबद्दल समितीच्या पदाधिकार्यांनी सदर बाजार पोलिसांचे आभार मानले.