ब्रेकिंग
वाहनांनी योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घेण्याचे आवाहन

0
3
8
4
2
7
जालना/प्रतिनिधी,दि.4
चालु शैक्षणिक वर्षात अधिकृतपणे विद्यार्थी वाहतूक करणारे वाहने, स्कूल बसेस इत्यादी वाहनांची योग्यता प्रमाणपत्र, परवाना, विमा, पियुसी, वाहनकर, चालक अनुज्ञप्ती (ड्राव्हिंग लायसन) इत्यादीची विधी ग्राह्यता स्कूल बस कमिटी तसेच शाळा प्रशासनातर्फे तपासून घ्यावे. तसेच योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण झाले नसल्यास तात्काळ वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण (फिटनेस सर्टीफिकेट रिन्युव्हल) करावे, कोणत्याही परिस्थितीत योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण संपलेल्या वाहनांमध्ये विद्यार्थी वाहतूक होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
0
3
8
4
2
7



