21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

जालना/प्रतिनिधी,दि.19
पंतप्रधान महोदयांनी सन 2014 च्या राष्ट्रीय महासभेत दि. 21 जुन 2024 हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दि. 21 जुन 2024 रोजी जागतिक योग दिन दिनाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यभर सामुहिक योग शिबीर प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा प्रशासन, जिल्हास्तर योग समिती, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयासह विविध संघटनेच्या संयुक्त विद्यमाने दि.21 जुन रोजी जिल्हा क्रीडा संकुलावर सामुहिक योग व प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त अधिकारी- कर्मचारी, खेळाडू, क्रीडा संघटक, क्रीडा प्रेमी, युवक युवतींनी योग दिनात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा प्रशासन, जिल्हास्तर योग समिती, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) जिल्हा परिषद, जालना, क्रीडा भारती, जिल्हा योग संघटना जालना, सार्वजनिक आरोग्य़ विभाग, जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र, विविध योग संघटना, जिल्हा स्काऊट गाईड, तंत्र निकेतन महाविद्यालय व जिल्हा एकविध क्रीडा संघटना, विविध क्रीडा मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 जुन 2024 रोजी सकाळी 6.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे सामुहिक योगा व प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर योग प्रात्यक्षिकासाठी येतेवेळी अंगावर पांढरा ड्रेस असावा, सोबत मॅट/सतरंजी, पाणी बॉटल व नॅपकीन असावा. अधिक माहितीसाठी क्रीडा कार्यालयाचे संतोष वाबळे (मो.7588169493,) आणि रेखा परदेशी (मो.9022951924) यांच्याशी संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.