pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उरण नगरपरिषदचे माॅंसाहेब मीनाताई ठाकरे वाचनालयातील अभ्यासिकेमध्ये उदंड प्रतिसाद.

0 1 6 5 1 4

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3

उरण नगरपरिषदचे माॅसाहेब मिनाताई ठाकरे वाचनालय, उरण येथील अभ्यासिकेमध्ये नियमित येणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या सहकारी विद्यार्थ्यांना सहज आपल्याला उत्तम प्रकारे समजलेला विषय ईतर विद्यार्थ्यांना समजावून सांगणे हा उपक्रम सुरू केले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन ग्रंथपाल संतोष पवार यांनी केले. यावेळी पत्रकार विठ्ठल ममताबादे उपस्थित होते त्यांनी या उपक्रमाबद्दल सहभागी विद्यार्थ्याचे कौतुक केले आणि यापुढे सतत असे उपक्रम राबवलेच पाहिजेत असे मत व्यक्त केले. या उपक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडत असलेला विषय एक ते दोन तास शिकवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे दर रविवारी एका विषयावर आधारित २५ प्रश्नांची प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी हि देखील त्या त्या विद्यार्थ्यांनी घेतली त्याचीही सुरुवात दि. २/७/२०२३ रोजी पहिली गणित विषयाची पहिली चाचणी लेखी परिक्षा घेण्यात आली. व्याख्यान देण्याचा पहिला मान तसेच पहिल्या चाचणी परिक्षेचा पेपर काढण्याचा मान अगदी ह्या उपक्रमाची सुरुवात करण्याचा मान कु. सलोनी विलास कडू – सोनारी उरण हिला मिळाला आणि ह्या विद्यार्थ्यांनीने गणित – बुद्धिमत्ता हा विषय अगदी सहज समजेल या पद्धतीने शिकविण्याचा प्रयत्न केला तसेच प्रश्न पत्रिका काढली आणि चाचणी परिक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अगदी सहज समजेल अशा पद्धतीने आवश्यक त्या प्रश्नाची उत्तरे माजावून सांगितले अशा प्रकारे विचारांचे आदान प्रदान करण्यात आले.हया उपक्रमाचा स्वीकार सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे केला . ह्या व्याख्यानानंतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी आपले विषय आपापसात विभागून घेतले आणि अभ्यासिकेमध्ये अधिक प्रोत्साहनवर्धक वातावरण निर्माण झाले आहे. उरण नगरपरिषदचे माॅंसाहेब मीनाताई ठाकरे वाचनालय, अभ्यासिकेचे उद्घाटन प्रसंगी बोलताना ग्रंथपाल संतोष पवार यांनी उपक्रमा संदर्भात आपले मत व्यक्त करताना अभ्यासिकेची संकल्पना मा. श्री. महेंद्र कल्याणकर कोकण विभाग आयुक्त यांनी प्रथम मांडली, या व्याख्यानमालेत व्याख्यान देण्याचा पहिला मान कु. सलोनी कडू हिला मिळाला या विद्यार्थ्यीनीचे आणि सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि सांगितले की आपल्या वाचनालयामध्ये विद्यार्थ्यांना अपेक्षित सुविधा जसे उत्तम वातावरण तसेच स्पर्धा परीक्षेकरिता आवश्यक पुस्तके उपलब्ध करुन देणे ह्या करिता विशेष मार्गदर्शन व सहकार्य आपल्याला मुख्याधिकारी राहूल इंगळे साहेब यांचे लाभते आहे त्याचीच फलश्रुती हा उपक्रम आहे असे संतोष पवार यांनी मत व्यक्त केले.आज हया स्पर्धा परिक्षेबाबतचे वातावरण तयार होत असले बाबतचे समाधान व्यक्त करत असताना ह्याचे सातत्य विद्यार्थ्यांनी जपले पाहिजे ही विद्यार्थ्यांकडून अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धा परिक्षा द्यावयाच्या आहेत त्यांनी नक्कीच या संधीचा लाभ घ्यावा. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासिकेमध्ये येणे शक्य होत नाही त्या विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळा महाविद्यालयात त्या – त्या ठिकाणी सदर उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहनही संतोष पवार यांनी यावेळी केले. त्यांनी आणखी एक महत्त्वाची बाब सांगितली की शिक्षणाला पर्याय नाही तरी स्पर्धा परीक्षेच्या तयारी अनुषंगाने विद्यार्थ्यांकरिता असे उपक्रम आपल्या शाळा महाविद्यालयात राबविणे आवश्यक आहेत. काही शाळांमध्ये राबविले जात आहेत . प्रत्येक शाळेत राबविणे आवश्यक आहेत. तसेच विद्यार्थ्यांना ४५ मिनिटे वाचनासाठी द्यावीत आणि १५ मिनिटे जे वाचले आहे त्याआधारे सारांश लेखनासाठी द्यावीत ह्यामुळे नक्की विद्यार्थ्यांना त्यांचे व्यक्तीमत्व घडण्यासाठी फायदा होणार असे मनोगत व्यक्त करून पुन्हा आपण विद्यार्थ्यीनी आपल्या अभ्यासात सातत्य ठेवा असे सांगून सहभागी सर्वांचे आभार मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथालयाचे सहाय्यक कर्मचारी जयेश वत्सराज यांनी मेहनत घेतली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 6 5 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे