नांदेड जिल्ह्यातील अनेक परिसरात वन्यप्राण्यांकडुन शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते प्रशासन वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त करील काय? चंपतराव डाकोरे पाटील

नांदेड/प्रतिनिधी,दि.25
नांदेड जिल्ह्यातील अनेक परिसरात वन्यप्राण्यांकडुन शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असल्याच्या बातम्या शेतकरी करीत असलेल्या तक्रारीकडे प्रशासन लक्ष देऊन वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त वनविभागात चौहोबाजूने तारांची जाळि बसऊन वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त केला तर शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होनार नाहि.
कारण हरणाची शिंकार करणाऱ्यावर कायदेशिर कडक कार्यवाही करण्याचा कायदा असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक परिसरात हरणाची उत्पती खुप प्रमाणात झाल्यामुळे अनेक शेतोशेती कोवळ्या पिकाचे नुकसान हरणाचे कळपाने होत असून तुडुन फिरून,कोवळे पिकाचे शेंडे खात असल्यामुळे भर पावसात शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या हुसकावून पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून पिक राखण्यासाठी रात्र होईपर्यंत जागे राहावे लागते तरी हरणाचे कळप पहाटेच्या वेळि पिकाचे नुकसान करित आहेत.
शेतकऱ्यांच्या नशिबि अगोदरच पाऊस उशिरा त्यात पेरणी पासुन लहान मोडालाच पावसाचे पाणि लागल्यामुळे शेतकरी संकटात असताना त्यात वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी संकटात आल्यामुळे वन विभाग व प्रशासन वन्यप्राण्यांच्या त्वरित बंदोबस्त करुन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी
त्वरीत वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त करावा असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी प्रसिद्धी दिली