चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांना मा.खा.धैर्यशिल माने ,मा.आ. अशोकराव माने अनेक मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श दिव्यांग भुषण पुरस्काराने सन्मानित

नांदेड/प्रतिनिधी,दि 15
दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांनी दिनदुबळ्या ईश्वररूपी दिव्यांग वृध्द निराधाराच्या, उपेक्षित समाजाच्या प्रत्येक स़कटसंमयी समाजसेवेच्या कार्याची यु टुब, व्हाटस अप्प, सोशल मिडिया द्वारे न्यायासाठी केलेल्या आंदोलन,संघर्षाची ऑनलाईन राज्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यानी दखल घेऊन आज आठेचाळीसवा राज्यस्तरीय आदर्श दिव्यांग भुषण पुरस्कार साप्ताहिक विशाल क्रांती व विशाल क्रांती न्युज चे संपादक अप्पासाहेब भोसले, न्यूज चे उपसंपादक संजय पाटिल यांनी कार्याची दखल घेऊन राज्यातील समाजसेवेचे वृत्त स्विकारले द्या सामाजिक, राजकिय, सांस्कृतिक,पर्यावरण, शैक्षणिक, महिला सबलिकरण,अनेक क्षेत्रांत कार्य करणाऱ्याचा गौरव म्हणून साप्ताहिक विशाल क्रांती व विशाल क्रांती न्युज यांच्या वतीने इचलकरंजी येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष मां.चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांचा सत्कार मा.खासदार धैर्यशील (दादा) माने ,मा.आ. अशोकराव माने(बापु), कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉ.मा.विजयानंद माने
शिवसेना( जि.अध्यक्ष मां.रविंद्र माने साप्ताहिक न्यूज चे संपादक अप्पासाहेब भोसले, उपसंपादक संजय पाटिल अनेक मान्य वरांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
त्यांचा नांदेड जिल्हातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय स्थरावर डाकोरेचे
अभिनंदन केले जात आहे.
दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र मराठवाडा प्रमुख मा.सुधाकरराव पिलगुंडे,म.सचिव दिपकराव जाधव,जि.अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले,जि.संपर्क प्रमुख नागोराव बंडे पाटील,जि.ऊप अध्यक्ष राजु भाऊ शेरकुरवार,जि.सचिव अनिल रामदिनवार सर्व ता.अध्यक्ष ,सर्व प.स.,जि.प. सर्कल प्रमुख,शा.प्रमुख यांनी अभिनंदन करत आहेत असे प्रसिध्दी दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट् नांदेड यांनी दिले.