रामचंद्र म्हात्रे विद्यालयात मोफत चष्मा वाटप शिबीर व महिला दिन संपन्न.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.9
ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांच्या स्मृती दिनानिमित्त २१ जानेवारी २०२५ रोजी रामचंद्र म्हात्रे विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स येथे आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या सहकार्याने मोफत नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ७२५ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांमध्ये नेत्र दोष आढळला त्यांना ८ मार्च या महिला दिनाचे औचित्य साधून मोफत चष्मा वाटप करण्यात आले.मोफत चष्मा वाटप आणि महिला दिनानिमित्त कार्यकामासाठी उपस्थित असलेल्या सर्व महिला मान्यवर, शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर महिला यांचा भेटवस्तू व गुलाब पुष्प देवून सन्मान करण्यात आला. यावेळी इयत्ता सहावी मधील विद्यार्थीनी माही भोसले हिने महिला दिनावर आधारित स्वरचित कविता सादर केली. यावेळी आवरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती निराताई पाटील, श्रेया अकॅडमीच्या अध्यक्षा स्मिता म्हात्रे,राजश्री गावंड, आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलच्या ज्योती पाटील, प्राचार्य सुभाष ठाकूर, सर्व महिला शिक्षिका व सर्व महिला शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थीनी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर म्हात्रे तर आभार प्रदर्शन राजेंद्र शिंदे यांनी केले.