राज्य शासनाच्या वतीने आज सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा पूर्णपणे फसवा आणि आगामी विधानसभा निवडणुकीचा जुमला असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी दिली आहे. राज्य आणि केंद्रातील सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. वाढती महागाई,बेरोजगारी,शेत मालाला मिळत असलेला कवडीमोल भाव आणि सर्व सामान्य जनतेसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसल्यामुळे डोळे उघडलेल्या महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज शुक्रवारी विधिमंडळाच्या अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडून राज्यातील जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आश्वासनाला न जागणाऱ्या या सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सुज्ञ जनता त्यांची जागा निश्चितपणे दाखवील असा विश्वास आ. गोरंटयाल यांनी व्यक्त केली आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा