pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शेतकरी मदतीपासून अजूनही वंचित. अनुदान वर्ग करण्याची निवेदन देऊन केली मागणी.

0 3 8 4 4 1

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.23

मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात जाफ्राबाद तालुक्यात झालेल्या गारपीट चे पंचनामे व केवायसी होऊन वर्ष उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.याबाबत त्रस्त शेतकऱ्यांनी सोमवारी निवासी जिल्हाधिकारी गणेश महाडिक यांना निवेदन देऊन तात्काळ अनुदान वर्ग करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की 26 फेब्रुवारी 2024 रोजी जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी व परिसरात मोठ्या प्रमाणावर गारपीट व अतिवृष्टी झाली होती त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी गारपीटग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला गेला त्यानुसार शासकीय मदतीची यादीही प्रशासनाकडे उपलब्ध झाली संबंधित शेतकऱ्यांनी केवायसी अपडेटही पूर्ण केले परंतु ही मदत खात्यात वर्ग झाली नसल्याने शेतकऱ्यांनी वेळोवेळी तहसीलदार जाफराबाद यांना या संदर्भात माहिती मागितली परंतु अपेक्षित उत्तर व अनुदान प्राप्त झाले नसल्याने सोमवारी त्रस्त शेतकऱ्यांनी मदत मिळण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर खालील शेतकरी यांची सही आहे त्यात संजय राऊत, श्रीराम आवटी,रघुराम उखर्डे कृष्णा धनवई, पांडुरंग बोरसे,गंगाबाई देशमुख, शालिग्राम धनवई रायभान महानोर कृष्णा धनवई लक्ष्मी महानोर बालाजी भागवत, सखाराम उखर्डे , ठकसेन उखर्डे, दगडूबा उखर्डे,आसिफ सिद्दीकी संजय कळंके,बालाजी कुमकर,चंद्रकांत देशमुख यांनी निवेदन दिले.

——————————————————–

अनुदाना संदर्भात आपण वेळोवेळी तहसील कार्यालयात आवश्यक ती बाब पूर्ण केली आहे परंतु वारंवार तहसील कार्यालयाकडून गारपीट अनुदाना संदर्भात व्यवस्थित माहिती पुरविली जात नाही यामुळे जिल्हाधिकारी यांनी याप्रकरणी लक्ष देऊन वर्षभरापासून रखडलेले आमचे अनुदान खात्यात वर्ग करावे.
ठकसेन उखर्डे, त्रस्त शेतकरी टेंभुर्णी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे