माजी नगराध्यक्ष तथा जेष्ठ समाजसेवक खुशालसिंग (राणा) ठाकुर यांच्या वाढदिवसानिमीत्त फेंटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने जालना जिल्हा फेंटबॉल असोसिएशन यांच्या वतीने दि. 4 ते 6 जानेवारी 2024 दरम्यान दुसर्या राज्यस्तरीय सब ज्युनीयर, ज्युनीयर व सिनीयर तसेच पहिल्या मिनी सब ज्युनीयर फेंटबॉल अजिंक्यपद स्पर्धा 2023- 24 चे आयोजन जे.ई.एस. महाविद्यालय जालना येथे करण्यात आले आहे.
स्पर्धेचे औपचारीक उद्घाटन दि. 5 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 ः 30 वाजता मान्यवरांच्या हस्ते होईल. सदर स्पर्धेत महाराष्ट्रातुन जवळपास 12 ते 15 जिल्हे व साधारणतः 24 संघ सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धेतुन पुढच्या महिन्यात होणार्या राष्ट्रीय स्पर्धेकरीता राज्याचा संघ निवडला जाईल.
स्पर्धेच्या यशस्वीतेकरीता असोसिएशनचे संस्थापक तथा सचिव शेख चाँद पी.जे., राज्य कार्याध्यक्ष अक्षय पवार, आयोजन समितीचे अध्यक्ष शेख अहेमद, संयोजन समीतीचे बबन दादा सोरटी, डॉ. हेमंत वर्मा, विजय गाडेकर, सचिन आर्य, प्रा. गायत्री सोरटी, श्रीमती वैशाली सरदार, श्रीमती सुनीता गवई, अॅड. अमजत पठाण, राजकुमार दांडगे, विशाल साळवे, सुरेश त्रीभुवन, जयकुमार वाहुळे, उमेशचंद्र खंदारकर, सुभाष पारे, तुषार गर्जे, युवराज गाढेकर, अमोल सातपुते, सुरेश सावंत, शेख मतीन, नितीन जाधव, मो. मारूफ खान, संतोष वाघ, राजेभाऊ मगर, ऋषींद्र डोंगरे, अमेाल काटकर, शेख समीर, सोहेल खान, वेदांत सोरटी, शेख साबेर तसेच आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य परीश्रम घेत आहेत.