बजाजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात अखंड नाम जप यज्ञ सप्ताहास प्रारंभ.

छ.संभाजीनगर/अनिल वाढोणकर,दि.12
अखील भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ त्र्यंबकेश्वर अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित बजाजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त श्री गुरूचरीत्र ग्रंथ सह अनेक ग्रंथांचे सामुदायिक पारायण मोठ्या भक्तिभावाने सुरू झाले आहे.
दि१२ ते १८ एप्रिल दरम्यान सकाळी ८:३०,१०:३० या वेळेत सामुदायिक पारायण होत असून जवळपास महिला सेवेकरी 951 तर पुरुष सेवेकरी 113 यांनी सहभाग नोंदविला आहे, श्री गुरू चरित्र ग्रंथ, नवनाथ ग्रंथ, श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथ,दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्तशसती,श्री स्वामी चरित्र,भागवत ग्रंथ, गुरू गिता आदी ग्रंथ वाचन होत आहे. सायंकाळी सामुदायिक आरतीनंतर,श्री विष्णू सहस्त्रनाम, आदी सेवा सुरु आहेत.सदरील केंद्रात अनेक सामाजिक उपक्रम ही राबविल्या जातात, जवळपास अठरा प्रकारचे सेवा पुरविल्या जातात, बाल संस्कार केंद्र, व्यसनमुक्ती, विवाह सेवा, वास्तुशास्त्र, माहिती तंत्रज्ञान विज्ञान, स्वयं रोजगार, आयुर्वेद, कृषी मेळावा,पशु पालन,प्रश्न उत्तरे सेवा, दुःखी,पिडीत,व व्यसनाधीन व्यक्तींना भक्ती मार्गाकडे वळवून त्यांच्या जिवनात आनंद निर्माण करण्याचा उपक्रम या केंद्राद्वारे राबविल्या जातात,सदरील केंद्रा साठी भव्य सभामंडप व सुशोभीकरण करण्यात आले आहे.स्वच्छता व शांतता परिसर म्हणून या स्वामी सेवा केद्राचा नावलौकिक होत आहे.श्रीस्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनेक सेवेकरी वेळ देऊन कार्यक्रम यशस्वी करीत आहेत.