नवघर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते उद्घाटन

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.19
रविवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी नवघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख व उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर म्हणाले की नवघर ग्रामपंचायत च्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेल्या या प्राथमिक केंद्रातून सर्वसामान्य गरीब व गरजू नागरिकांना योग्य ती आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी व व वेगवेगळ्या आजारांचे निदान होऊन ते बरे व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो.
सदर कार्यक्रमास माजी उपसभापती महादेव बंडा, माजी सरपंच दौलतशेठ घरत, माजी उपसरपंच रवींद्र भोईर, शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे,माजी उपसरपंच सुरेश बंडा ,युवा सेना नवघर विभाग प्रमुख कु. चेतन पाटील ,उपशाखाप्रमुख विशाल डाके, नितीन मढवी, संतोष पाटील, भूपेंद्र पाटील, अमित जोशी, रंजीत म्हात्रे ,सौरभ घरत, नवघर गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी नवघर ग्रामपंचायत व पॅनेसिया हॉस्पिटल सोनारी यांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र नवघर येथे मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सामान्य तपासणी, डायबेटीस, ब्लड प्रेशर, हृदय विकार, सर्जरी, हाडांचे आजार, स्त्री रोग, नाक, कान, घसा आदीं रोगांची तज्ञ डॉक्टर कडुन मोफत तपासणी करण्यात आली. तपासणी करून नागरिकांना मोफत औषधे सुद्धा वाटप करण्यात आले.या आरोग्य शिबिराचा नागरिकांनी, ग्रामस्थांनी मोठया प्रमाणात लाभ घेतला.
कार्यक्रमाचे आयोजन नवघर ग्रामपंचायतचे सरपंच सविता नितीन मढवी, उपसरपंच विश्वास बळीराम तांडेल, माजी उपसरपंच दिनेश वसंत बंडा, ग्रामपंचायत सदस्य प्रियदर्शनी अविनाश म्हात्रे, श्रीमती उषा कृष्णा बंडा, प्राची महावीर पाटील, अक्षरा अमित जोशी, नयना कुंदन बंडा, जयमाला अरुण पाटील, रंजना धनंजय भोईर, कविता संतोष पाटील, आरती मंगेश चौगले, संध्या रवींद्र पाटील, रत्नाकर हरिचंद्र चौगले, नम्रता गणेश पाटील, कुंदन विलास कडू ग्रामविकास अधिकारी जी.के. म्हात्रे यांनी केले होते.