जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त 15 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.12
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना अणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना यांचे संयुक्त विद्यामाने सोमवार दि. 15 जुलै, 2024 रोजी जालना येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत “जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी रोजगार इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त भुजंग रिठे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
मेळाव्यात दहावी बारावी, आय.टी.आय., बी.ए., बी.कॉम, बी.एस सी., एम.कॉम, डिप्लोमा व बी.ई., डिप्लोमा अॅग्री, बी.एस सी. अॅग्री, एम.एस.सी. अॅग्री, एम.बी.ए, एम.बी.ए., एम.एस.डब्यु. इत्यादी पात्रताधारक नोकरी इच्छुक महिला उमेदवारासाठी एकूण 551 रिक्त पदे उपलब्ध असून मुलाखतीसाठी विविध 14 कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच, कौशल्य विकास प्रशिक्षण व स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करणा-या शासनाच्या विविध महामंडळांचे स्टॉल्स लावून विविध योजनांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
रोजगार मेळाव्यामध्ये मेटारोल ईस्पाट प्रा. लि. एमआयडीसी, जालना यांची 13 पदे, विक्रम टी प्रोसेसर प्रा. लि., जालना यांची 20 पदे, एन.आर. बी. बियरिंग्ज लिमिटेड एमआयडीसी, जालना यांची 50 पदे. धूत ट्रान्समिशन प्रायव्हेट लि. एमआयडीसी शेंद्रा, छत्रपती संभाजीनगर यांची 150 पदे, टॅलेनसेतु सर्व्हिसेस प्रायव्हेट लि. पुणे यांची 50 पदे, एस.आर. जे स्टील प्रा.लि. जालना यांची 10 पदे, भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल प्रा. लि. एमआयडीसी, जालना याची 25 पदे, अॅप्रोक्रॉप इंजिनिअरींग प्रा.लि. आयडीसी, जालना यांची 6 पदे, नव-भारत फर्टिलायझर्स लि. छत्रपती संभाजीनगर यांची 13 पदे, ओम साई मॅनपॉवर प्रा.लि. जालना यांची 40 पदे, कॅनपॅक इंडिया प्रा.लि छ. संभाजीनगर यांची 8 पदे, पिपल ट्री व्हेंचुअर प्रा. लि. नागपुर यांची 150 पदे, विनोद रॉय इंजिनिअरींग प्रा.लि यांची 4 पदे, भुगी कॉटेक्स इंडस्ट्री प्रा.लि. जालना यांची 11 पदे अशी एकूण 551 रिक्तपदे उपलब्ध आहेत. या मेळाव्यासाठी वरील 14 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी प्रत्येक्ष उपस्थित राहणार असुन पात्र उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेऊन विविध पदांच्या रिक्त जागांसाठी निवड व भरती करणार आहेत. या सुवर्ण संधीचा रोजगार इच्छुक जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा आणि किमान पाच प्रतीत रिझुम/बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे आणि आधार कार्ड, सेवायोजन नोदणी छायाप्रतीसह सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोकरी साधक म्हणून नोंदणी करावी. तसेच, यापुर्वी महारोजगार वेब पोर्टलवर नोंदणी केली असल्यास वरील सुधारीत संकेतस्थळावर आपला 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावी. तसेच या वेबपोर्टलवर लॉग-इन करुन जॉब फेअर टॅबवर क्लिक करुन जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे विविध कंपन्याच्या उपलब्ध रिक्त पदांसाठी अॅप्लाय करावे, यासाठी काही अडचण आल्यास कार्यालयीन दुरध्वनी व व्हॉटस्अप क्र. 02482299033 वर संपर्क करावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.