लायन क्लब ऑफ द्रोणागिरी आणि लिओ क्लब ऑफ द्रोणगिरीचा पदग्रहण सोहळा संपन्न.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.30
दि.२९/०६/२०२४ रोजी लायन क्लब ऑफ द्रोणागिरी आणि लिओ क्लब ऑफ द्रोणगिरीचा नवीन पदाधिकारी यांचा पदग्रहण सोहळा पांडुरंग चांगु पाटील स्कूल चारफाटा उरण येथे संपन्न झाला.यावेळी सर्व लायन व लिओ पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.अध्यक्ष लायन सागर चौकर,उपाध्यक्ष लायन भूमिका सिंग,सेक्रेटरी लायन मोनिका चौकर व खजिनदार लायन ॲड दिपाली गुरव व तसेच लिओ तर्फे लिओ अध्यक्ष लिओ ॲड चेतन भोईर, उपाध्यक्ष लिओ सेजल ब्राह्मणे,सेक्रेटरी लिओ विनीत कासकर,व खजिनदार लिओ आरती सुरवसे या नवीन पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून पदभार देण्यात आले. या नवीन पदग्रहण सोहळ्या निमित्त नाईक नगरच्या मुलांनी व उपस्थित सर्व पाहुण्यांनी सिड बाॅल चे उद्घाटन केले त्याच बरोबर शैक्षणिक साहित्य वाटप ही करण्यात आले व जमलेल्या पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी नृत्याचे ही आयोजन करण्यात आले होते.लायन क्लब ऑफ द्रोणागिरी तसेच लिओ क्लब ऑफ द्रोणगिरी गेले ३ वर्ष उरण मध्ये सातत्याने समाजकार्य करत असून लायन क्लब चा इतिहास आपण बघितला असाल तर इंटरनॅशनल पातळी वर त्यांचं खूप मोठ नाव आहे.लायन मेम्बर्स् च्या मदतीने वेगवेगळे ॲक्टिव्हिटी दिवसेन दिवस होत असून एज्युकेशन,अन्न दान,मेडिकल कँप,सिड बॉल,झाडे लावणे,बीच क्लीन करणे,कॉलेज साठी सेमिनार अशा विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटी होतच असतात. समाजासाठी एक हातभार लावण्यासाठी क्लब मधील मुल आज सातत्याने काम करत आहेत.आणि यापुढे ही गोर गरिबांसाठी व लोकांसाठी काम करत राहतील असा हा क्लब नेहमी सर्वांसाठी मदत करण्यासाठी सर्वात पुढे आहे.
उपस्थित पाहुणे पी.एम. जे.एफ लायन एन.आर परमेश्वरन,लिओ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट जेडेन सॉलोमन, पी एम जे एफ लायन अनुप थरवानी, पी एम जे एफ लायन नमिता मिश्रा, झोन चेअरपरसन अल्केश शहा, रीजन चेरपरसन सुयोग पेंडसे,लायन सीमा घरत,लायन मिलिंद पाटील, लायन रमाकांत म्हात्रे लायन संदीप म्हात्रे,लिओ सिद्धी साळुंके व सर्व लिओ व लायन क्लबचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.