भेंडखळ ग्रामपंचायत तर्फे ध्वजारोहण.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.15
घर घर तिरंगा अभियान व स्वातंत्र्यदिनानिमित्त दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी उरण तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय भेंडखळ येथे झेंडा फडकवण्याचा कार्यक्रम ग्रामपंचायत सदस्य अक्षता ठाकूर यांच्या शुभहस्ते झेंडा फडकवून संपूर्ण झाला. सदर झेंडा वंदन कार्यक्रमाला सरपंच मंजिता पाटील, उपसरपंच अभिजीत ठाकूर, सदस्य दिपक ठाकूर, अजित ठाकूर, लिलेश्वर भगत सदस्या सोनाली ठाकूर, संगीता भगत, स्वाती पाटील ,स्वाती घरत शितल ठाकूर, प्राची ठाकूर, ग्रामविकास अधिकारी किरण केणी, कार्यालयीन कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नेते मंडळी, प्राथमिक शाळेचे विद्यार्थी शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका कर्मचारी यांनी राष्ट्रगीत गायले आणि झेंड्याला मानवंदना दिली. तसेच दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी भेंडखल प्राथमिक शाळा येथून प्रभात फेरी काढून ती गावांमध्ये स्वातंत्र्याची गाणी आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या यांच्या नावाची घोषणा देत गावात प्रभात फेरी काढण्यात आली होती.नंतर ग्रामपंचायत कार्यालय येथील झेंडावंदनाचा कार्यक्रम सरपंच मंजीता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सदर झेंडावंदन कार्यक्रम करिता ग्रामपंचायत उपसरपंच अभिजीत ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य दिपक ठाकूर, अजित ठाकूर, लिलेश्वर भगत, सदस्या अक्षता ठाकूर, सोनाली ठाकूर, स्वाती घरत, संगीता भगत, स्वाती पाटील, प्राची ठाकूर, शितल ठाकूर, ग्राम विकास अधिकारी किरण केणी, कार्यालयीन कर्मचारी मराठी शाळेचे शिक्षक वर्ग,माध्यमिक शाळेचे चेअरमन के एस ठाकूर, माध्यमिक शाळेचे शिक्षक वर्ग अंगणवाडी कर्मचारी, गावातील माजी सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या उपस्थितीत झेंडावंदनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.