pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सत्यशोधक विद्यालय गोषेगाव येथे गणित विषयावर मार्गदर्शन तसेच संत रविदास महाराज यांचा स्मृती दीन साजरा

0 3 8 4 4 1

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.27

मानव विकास व पूर्णनिर्माण संशोधन संस्था औरंगाबाद संचलित सत्यशोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोषेगाव ता. भोकरदन जि.जालना येथे आज दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी संत रविदास महाराज यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक गणित विषयाचे श्री.के.व्हि.सपाटे यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्याचे स्वागत विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री इफरोज पठाण यांनी केले. मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी सर्वात गणित विषयाचे पाठ्यपुस्तका मधील सर्व उदाहरणाचा अभ्यास केला तर आपणास कोणतेही क्लास किंवा इतर कोणत्याही गाईड, अपेक्षित आवश्यकता भासत नाही. तसेच परीक्षेमध्ये वेळे चे नियोजन महत्त्व पूर्ण आहे. अशा छोट्या-मोठ्या बऱ्याच क्लुप्त्याचे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक क्षेत्राविषयी मार्गदर्शन करून गणित विषय हा दैनंदिन व्यवहाराचा विषय असून त्याचा अभ्यास प्रत्येक विद्यार्थ्यांने करणे गरजेचे आहे.
विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.पठाण यांनी विद्यालयाची यशोगाथा वाचत आयुष्य जगत व्यवहारीक जीवनात प्रत्येकजण गणित विषय अभ्यासत असतात. श्री.निलेश कंकाळ यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन श्री.लक्ष्मण पांढरे यांनी करून संत रविदास महाराज याविषयी विचार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे गणित विषयाचे श्री. निलेशकंकाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य श्री.सुनीलजी वाकेकर तसेच संस्थेच्या सचिव श्रीमती जयश्रीताई बनकर यांचे मार्गदर्शन लाभले . कार्यक्रमानिमित्त सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे