pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

वायफना येथील अनाथ मुलीच्या कन्यादानासाठी सहशिक्षक सटवाजी पवार यांची सामाजिक बांधिलकी

निवृत्ती वानखेडे सह दानशूर व्यक्तीचा सहभाग

0 1 7 4 0 5

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.12

मौजे वायफना ता.हदगांव येथील कोमल गाडगेराव यांच्या जिवनाची गाथा मन हेलावून टाकणारी आहे.वडील सुभाषराव गाडगेराव यांना दोन मुली एक मुलगा पत्नी आई वडील असा परिवार उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने रोजमजुरी करून आपण कल्पनाही करू शकत नाही अस्या माती व कुडाणाच्या घरात राहून उदरनिर्वाह करीत असताना आई शांताबाईचे चार वर्षांपूर्वी कन्सर आजारामुळे निधन झाले. तर या धक्क्यातून सावरत असतानाच वडीलाचेही आजारपणामुळे निधन झाले.हलाकीच्या परीस्थितीतच मोठ्या बहिणीचा विवाह झाला.आजी आजोबा च्या आश्रयाने दिवस काढत असताना कोमलचा विवाह उमरी तालुक्यातील सोमठाणा येथील मुलांशी जुळला.रवीवार नऊ जुलै रोजी वरमंडपी सोमठाणा येथे विवाह संपन्न होणार असताना काहीच साहित्य खरेदी करू शकले नसल्याची माहिती गावातील अचीतराव वायफनकर यांनी रयत प्रतिष्ठानला कळवुन मदतीची अपेक्षा व्यक्त केली. एका वर्षात अनेक गरजु कुटुंबासाठी आशेचा किरण ठरलेल्या रयत प्रतिष्ठानच्या ग्रुपमध्ये संस्थापक सटवाजी पवार जवळगावकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत निवृत्ती वानखेडे मानवाडीकर यांनी आपल्या वाढदिवसाचा अनाठायी खर्चात बगल देत विवाहासाठी मदत केली.तर प्रगती कोचिंग क्लासेस चे कदम , अच्युतराव वायपनकर, पारवेकर, युनुस भाई सोनारीकर यांच्या सह रयत प्रतिष्ठानतील अनेक सदस्यांनी मदत केली.तर उर्वरित कन्यादान साहित्य खरेदीसाठी नेहमी प्रमाणे याही वेळी सटवाजी पवार जवळगावकर यांच्या भरीव योगदानाने सामाजिक कार्यकर्ते राजु पांडे हदगांवकर यांच्या सहकार्याने संसार उपयोगी सर्व साहित्य वधु विवाहासाठी वर मंडपी जात असताना आठ जुलै रोजी वायफना येथे घरपोच देत सामाजिक बांधिलकी जोपासली.विवाहाच्या एक दिवस अगोदर घरी आलेले साहित्य बघुन कोमल सह आजी आजोबा सह आजुबाजूची मंडळी नातेवाईकांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करीत गावकऱ्यांनी पुढाकार घेत गावातील दानशूर व्यक्तींनी योगदान दिले.
यावेळी रयत प्रतिष्ठानचे सदस्य राजु पांडे हदगांवकर, शिक्षक दापकेकर, प्रभाकर दहिभाते बरडशेवाळा , भगवान कदम वाळकीकर, पंजाबराव दुगाळे , विलासराव दुगाळे,हुंडेकर, गावातील प्रतिष्ठित नागरिक कार्यकर्ते पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वायफना येथील कोमल या अनाथ मुलीच्या कन्यादानासाठी सहशिक्षक सटवाजी पवार यांनी केलेली मदत कौतुकास्पद आहे. प्रत्येक गावातील गावकऱ्यांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी अश्या गरजु कुटुंबातील मदतीसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
राजु पांडे हदगांवकर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे