pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भीमजयंती निमित्त पाथरवाला खुर्द येथे एमपीएससीच्या धर्तीवर भव्य स्पर्धा परीक्षेचे आयोजन…

भीमजयंतीनिमित्त माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्र राज्य जालना जिल्हा कमिटी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरवाला खुर्द यांचा संयुक्त उपक्रम

0 1 1 8 2 2

वडीगोद्री/तनवीर बागवान,दि.15

अंबड तालुक्यातील पाथरवाला खुर्द येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले.यावेळी या उपक्रमात विद्यार्थी व पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी स्पर्धेत ७५ विद्यार्थी,विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.परीक्षेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,सामान्य ज्ञान,बुद्धिमत्ता व इतर महापुरुषांच्या जीवनावर आधारित एकूण १०० प्रश्न विचारण्यात आले होते.

गावातील विद्यार्थ्यांना महापुरुष यांच्या जीवनाबद्दल माहिती व्हावी व त्यांची वैचारिक पातळीत वाढ व्हावी,त्यांच्यामध्ये स्पर्धा परीक्षा विषयी आवड निर्माण व्हावी,एक कर्तृत्वान पिढी निर्माण व्हावी,स्वतःच्या विकासाबरोबर,गावाचा,देशाचा विकास व्हावा,आई-वडीलासह गावाचे नावही येणाऱ्या पिढीने मोठे करावे, याहेतूने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा उपक्रम राबवण्यात आला.

या परीक्षेचे सर्व नियोजन पेपर काढण्यापासून ते पेपर तपासून नंबर काढण्याचे कार्य माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्र राज्य जालना जिल्हा कार्याध्यक्ष श्री सखाराम घोडके हे करीत असतात.यावेळी समाजसेवक मेहरणाथ हर्षे,माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्र राज्य जालना जिल्हा सचिव राहुल ढवळे,प्रवीण हर्षे,दिपक सुडके,योगेश पाचुंदे,यांनी नियोजनात सहभाग घेतला.तर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ढाकणे,खराडे,लोहारे,मस्के,सूर्यवंशी,जोगदंड सर,धानुरे यांनी परीक्षेसाठी विशेष योगदान देऊन सहकार्य केले.यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 2