ब्रेकिंग
उसतोड मजुरांची दिवाळी सतीश घाटगेंनी केली गोड : फराळासह मुलांना कपड्यांचे वाटप

pub-7425537887339079
अंबड: ऊसतोड करणारे कुटुंब दिवाळीसारख्या महत्वाच्या सणालाही घर सोडून ऊसतोडीच्या ठिकाणी आपल्या लहान लेकरांना घेऊन राहतात. दीपावलीच्या या सणाचा आनंद त्यांना आणि त्यांच्या मुलांनाही साजरा करता यावा म्हणून समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी रविवारी ऊसतोड मजुरांना दिवाळी फराळ व मुलांना नवीन कपडे वाटप करून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.
अंबड तालुक्यातील भाडी॔ येथे शेकडो अनेक कुटुंब उसतोडीसाठी आलेले आहे. त्यांच्या उसाच्या फडावर जाऊन ऊसतोड त्यांना दिवाळी फराळ व लहान मुलामुलींना समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी नवीन कपडे वाटप केले. त्यांच्यासोबत बसून त्यांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. यावेळी लहान लेकरांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद झळकला. सतीश घाटगे सर्व गरिबांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी राजू छल्लारे ,नवनाथ डोईफोडे नासर भाई ,ज्ञानेश्वर डोईफोडे, अर्जुन नखाते,अर्जुन डोईफोडे,भिमराव बरडे, हारून भाई, विलास डोईफोडे, उध्दव लांडे, रामा डोईफोडे, राजु डोईफोडे,हरीश राठोड,सखाराम पानखडे, शेख जावेद, अर्जुन आनंदे रोहिदास मिसाळ, ज्ञानेश्वर घोडके व आदी उपस्थित होते.