काजळा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा भाजपा मध्ये प्रवेश

काजळा/प्रतिनिधी, दि 21
बदनापूर तालुक्यातील गट ग्रामपंचायत काजळा-पानखेडाचे सरपंच रंगनाथ देवकाते, उपसरपंच मनोहर जाधव, ग्रा.पं.सदस्य कैलास खंडेकर, अमोल मदनुरे, विलास खंडेकर तसेच दिलीप गावडे यांनी शुक्रवारी (दि. २०) रोजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पा. दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. आ. नारायण कुचे, जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांची यावेळी उपस्थिती होती.
केंद्रीयमंत्री श्री. दानवे यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले.. तसेच त्यांना पक्षातील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस पाटील लक्ष्मण पैठणे, माजी उपसरपंच गोरख शिंदे, आसाराम गरड, शिवाजी शिंदे, निवृत्ती राऊत, बाबासाहेब चव्हाण, राधेश्याम बळप, विलास गावडे, जगदीश शेळके, महेमूद सय्यद, विठ्ठल बळप, श्रीकांत खंडेकर, सुरज पांढरे आदींची उपस्थिती होती.