pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आज भोकरदन येथे शिवसेना दलित आघाडीचा कार्यकर्ता मेळावा -मोठ्या संख्येने उपस्थित रहा- दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. मगरे यांचे आवाहन

0 4 1 3 3 6
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी,दि.6
शिवसेना दलित आघाडी जालना जिल्ह्याच्या वतीने
भोकरदन-जाफराबाद तालुका स्तरीय दलित आदिवासी कार्यकर्ता मेळावा ७ जुलै रोजी शासकीय विश्रामगृहाच्या बाजुला भोकरदन येथे माजीमंत्री तथा आमदार
अर्जुनराव खोतकर व शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे
यांच्या उपस्थितीत होणार आहे. जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
शिवसेना दलित आघाडी जालना जिल्ह्याचे वतीने भोकरदन येथे भोकरदन-जाफराबाद
तालुका स्तरीय दलित आदिवासी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन ७ जुलै सोमवार रोजी आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याचे उद्घाटन माजीमंत्री आमदार
अर्जुनराव खोतकर करणार आहेत. तर अध्यक्षस्थानी शिवसेना दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे राहणार आहेत. या मेळाव्यात दलित आदिवासी
भुमिहिन, कास्तपट्टे, नियमानुकूलित करण्याबाबत तसेच तरुण बेरोजगारांना रोजगाराच्या संधी आर्थिक विकास महामंडळाकडून तसेच दलित आदिवासी
समाजामध्ये वाढती व्यसनाधिनता या विषयावर संपूर्ण चर्चा करुन दारु बंदीचा ठराव घेण्यात येणार आहे. आदी विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. तरी दलित
आदिवासी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अ‍ॅड. मगरे यांनी केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 3 3 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे