pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अतिक्रमणच अतिक्रमण चोहीकडे, अंबड नगरपरिषद गेली कुणीकडे?

15 दिवसाच्या आत अतिक्रमण न काढण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उच्च न्यायालयात दाखल करणार याचिका!

0 1 7 4 0 7

अंबड/अनिल भालेकर,दि.11

अंबड शहर हे मराठवाड्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असण्याबरोबरच शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक,कला, व्यापार क्षेत्रात नावलौकिक प्राप्त असे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. वर्षाच्या बाराही महिने अंबड शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांबरोबरच,जनतेची वर्दळ मोठ्या प्रमाणात होत असते. शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात अंबड शहरात येणारे शालेय विद्यार्थी, खरीदारीसाठी व शासकीय कामकाजासाठी पंचक्रोशीतील सर्वसामान्य जनता यांची मोठ्या प्रमाणात अंबड शहरात वर्दळ असते.त्यातच विदर्भाला पश्चिम महाराष्ट्राची जोडणारा मधला मार्ग म्हणून जालना बीड या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहना बरोबरच प्रवासी वाहनाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते.
परंतु अंबड नगर परिषदेच्या उदासीन कारभारामुळे शहरवासीयांबरोबरच,शालेय विद्यार्थी,व्यापारी,महिला, वाहनचालक यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असतो.अंबड शहरातून जाणाऱ्या मुख्य राष्ट्रीय महामार्गावर तसेच शहराच्या इतर भागातील झालेले अतिक्रमणाचा उच्चांक झाला आहे.
या गंभीर असुविधे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अंबड नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करून पंधरा दिवसाच्या आत अतिक्रमण नकाढल्यास अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुकारलेल्या आंदोलनामुळेच अतिक्रमण झालेली जागा मोकळी करण्यात आली होती परंतु कालांतराने याच जागेवर पक्के बांधकाम करण्यात आलेले आहे.याकडे नगरपरिषद प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असून नगरपरिषद प्रशासन व अतिक्रमण धारक यांच्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय निवेदनात नमूद करण्यात आला आहे.
जालना बीड मुख्य राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य बस स्थानक, विद्युत मंडळ, मारवाडी स्मशानभूमी, पंचायत समिती समोरील जागा अतिक्रमणित करून पक्के बांधकाम करण्यात आले आहे. याकडे हेतूपुरस्पर न. प दुर्लक्ष करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 6 सप्टेंबर 2021रोजी पंडित गोविंदराव जळगावकर नाट्यगृहासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अनोखे आंदोलन करत अतिक्रमण करण्याचे नाटक करण्यात आले होते.याची दखल घेत न.प मुख्याधिकारी यांनी माहेश्वरी मारवाडी स्मशानभूमीला दानपत्रात दिलेल्या जागेवरील अतिक्रमण पाडण्यात आले होते.
परंतु असे काय झाले की, सदरील जागेवर पुन्हा नव्याने पक्के बांधकाम करून तेथे किरायाचे गाळे देण्यात आले आहे. यात अंबड नगरपरिषद प्रशासन व अतिक्रमणधारक यांच्यात आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची चर्चा अंबड शहरात चालू आहे.
याबाबत अंबड नगर परिषद प्रशासनाने येत्या 15 दिवसात चौकशी करून संबंधित अतिक्रमण धारकावर कारवाई करून अंबड शहरास मोकळा श्वास घेण्याबाबत, अपघातास निमंत्रण ठरणाऱ्या अतिक्रमणाबाबत पंधरा दिवसाच्या आत ठोस उपाय योजना करावी नसता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्याबरोबरच अंबड नगर परिषदेच्या विरोधात माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांच्याकडे आपल्या विरोधात याचिका दाखल करण्यात येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना जिल्हाध्यक्ष बळीराम खटके, नंदू उबाळे, पंडित पाटील,विष्णू पुंड,महेश चोथे,अशोक आटोळे,शंकर निलाखे,संतोष बिबे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच सदरील निवेदनाची प्रत विभागीय आयुक्त संभाजीनगर जिल्हाधिकारी जालना तहसीलदार अंबड यांना देण्यात आली आहे.
शहराच्या विद्रोपीकरणासाठी कारणीभूत असणाऱ्या अतिक्रमणाबरोबरच शालेय विद्यार्थी महिला, आबाल वृद्ध, पादचारी वाहनधारक यांना होणाऱ्या मनस्तापाबाबत व अपघातास निमंत्रण ठरणाऱ्या अतिक्रमणाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या निवेदनावर अंबड नगरपरिषद काय उपाययोजना करते हे पाहण्याचे औचितत्याचे ठरणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे