pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळ; बेरोजगार व होतकरु अर्जदारांना कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

0 4 0 8 5 0
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.17

संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय जालनाकरीता सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी एन.एस.एफ. डी. सी. नवी दिल्ली यांच्याकडून योजनांचे भौतिक उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. मुदती कर्ज योजना 20, महिला समृध्दी योजना 40 लघु ऋण वित्त योजना 47, शैक्षणिक कर्ज योजना 20 चे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. वरील सर्व योजना एन.एस.एफ. डी. सी. नवी दिल्ली यांच्या मार्फत राबविल्या जातात चर्मकार समाजा अंतर्गत असणाऱ्या चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील अर्जदारांकडून विविध व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापुर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता तीन प्रतीत खालील ठिकाणी स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहुन दाखल करावेत त्रयस्थ/मध्यस्थामार्फत प्रकरणे स्वीकारले जाणार नाहीत.
कर्जाप्रस्तावा सोबत जोडायची कागदपत्रे :- जातीचा दाखला (सक्षम अधिकाऱ्याकडून घेतलेला असावा), अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला चालु वर्षाचा (तहसिलदार यांच्या कडून घेतलेला असावा), नुकताच काढलेला पासपोर्ट फोटो 3 जोडावे, अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, रेशनकार्ड दोन्ही बाजुने झेरॉक्स प्रत, आधार कार्ड/मतदान कार्ड/पॅन कार्ड झेरॉक्स प्रत, व्यवसायाचे दरपत्रक जीएसटीसह, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या जागेची भाडेपावती/करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा नमुना नंबर 8 लाईट बिल, टॅक्स पावती, मुदती कर्ज योजनेसाठी प्रकल्प अहवाल, व्यवसायाचे ग्रामपंचायत/नगर परिषद/यांचे नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसाया संबंधी तांत्रीक प्रमाणपत्र तसेच अनुभव दाखला, लाभार्थ्यांचे उद्योग आधार प्रमाणपत्र, लाभार्थ्यांचा सिबिल केडीट स्कोअर 500 च्या वर असावा रिपोर्ट, अनुदान व लाभ न घेतल्याबाबत प्रतिज्ञापत्र वरील प्रमाणे सर्व कागदपत्रे स्वयंसाक्षांकित करुन घोषणापत्र देण्यात यावे.
वरील योजनांचा महामंडळाच्या विहित नमुन्यात अर्ज दि. 17 मे 2023 पासुन ते दि. 7 जुलै 2023 कार्यालयीन वेळेत सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6.15 पर्यंत स्थळ जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जालना या ठिकाणी अर्ज वाटप व परीपुर्ण भरलेले अर्ज स्वीकारले जातील. जालना जिल्हातील प्रत्येक तालुक्यातील चांभार, मोची, ढोर, होलार या समाजातील बेरोजगार युवक युवतींना तसेच होतकरु अर्जदारांनी जास्तीत जास्त योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादितचे जिल्हा व्यवस्थापक अरुण राऊत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 5 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे