चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांना आदर्श दिव्यांग भुषण पुरस्कार घोषित

नांदेड/प्रतिनिधी,दि.6
दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांनी दिनदुबळ्या ईश्वररूपी दिव्यांग वृध्द निराधाराच्या प्रश्नाबदल शासन, प्रशासनास जागे करण्यासाठी दिव्यांग,वृध्द, निराधाराना संघटित संघर्षासाठी सहभागी करून त्यांना मिळणाऱ्या सवलतींची माहितीसाठी मेळावे घेऊन माहिती देऊन हक्काची जाणीव करून त्यांना संघटितपणे संघर्षात सहभागी करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील गाव तिथे दिव्यांग संघटनेची शाखा बोर्डासहित एकशे चौऱ्याऐंशी गावात स्थापन करून शासन प्रशासन नांदेड,पुणे संभाजीनगर, मुंबई येथील प्रशासकीय अधिकारी जागे करण्यासाठी अनेक प्रकारचे सदनिर आंदोलन, यु टुब,व्हाटस अप्प, सोशल मिडिया द्वारे न्यायासाठी केलेल्या आंदोलन,संघर्षामुळे अनेक सवलती दिव्यांचा, वृध्द निराधाराना मिळत आहेत.
एवढेच नाहि तर दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संघटनेच्या वतीने करोना काळात जे सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकिय अधिकारी, संपादक, प्रतिनिधी यांनी करोना काळात आपल्या जीवाची पर्वा न केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून
कोना पुरस्कार प्रमाणपत्र देऊन दोनशे पन्नास कार्य करणाऱ्या संघटनेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
या सर्व कार्याची दखल घेऊन मा.चंपतराव डाकोरेच्या कार्याची दखल घेऊन आजपर्यंत आठेचाळिसवा पुरस्कार कोल्हापूर येथील साप्ताहिक विशाल क्रांती व विशाल क्रांती न्युज यांच्या वर्धापन दिनानिमित्त घोषित करण्यात आला व दि.१३ एप्रिल २०२५ रोजी मां.खासदार श्री धैर्यशील माने दादा मा.आमदार अशोकराव माने बापु अनेक मान्यवरांच्या हस्ते इचलकरंजी येथे सन्मानित करण्यात येणार असल्यामुळे मा.चंपतराव डाकोरे पा यांचा सर्वं स्थरावर अभिनंदन केले जात आहे.
नांदेड जिल्हातील दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र मराठवाडा अध्यक्ष मा. सुधाकरराव पिलगुंडे,म.सचिव दिपकराव जाधव,जि.अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले,जि. संपर्क प्रमुख नागोराव बंडे पाटिल,जि.ऊप अध्यक्ष राजु भाऊ शेरकुरवार जि.सचिव अनिल रामदिनवार सर्व ता.अध्यक्ष,सर्व शा.प्र. पदाधिकारी अभिनंदन केले आहे असे प्रसिध्दी दिली