pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

श्री रामदास गवत्या गावंड कला, क्रीडा,शैक्षणिक व सामाजिक संस्था आवरे तर्फे मोरा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप

0 4 0 8 5 4
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि 4

श्री रामदास गवत्या गावंड कला, क्रीडा,शैक्षणिक व सामाजिक संस्था आवरे तर्फे जे.एम. म्हात्रे प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कूल मोरा – उरण या शाळेतील पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व गरीब गरजू विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षी श्री रामदास गवत्या गावंड सामाजिक संस्थेमार्फत २५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या व रायटिंग पॅड आदी शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.
श्री रामदास गवत्या गावंड कला, क्रीडा,शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संदीप गावंड व पदाधिकारी केशव गावंड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच साईनाथ गावंड यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचा वाटप करण्यात आले.
माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर यांनी मनोगत व्यक्त करत संस्थेचे आभार मानले.शाळेमध्ये आज गरीब गरजू विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे शैक्षणिक साहित्याचा वाटप हे श्री रामदास गवत्या गावंड कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक संस्थेने केले आहे असे मनोगत व्यक्त करत सुधीर मुंबईकर यांनी शाळेच्या वतीने संस्थेचे आभार व्यक्त केले. केशव गावंड संस्थेचे सेक्रेटरी यांनी श्री रामदास गवत्या गावंड कला, क्रीडा,शैक्षणिक व सामाजिक संस्था आवरे ही संस्था गेली वीस वर्षापासून कोणकोणते कार्यक्रम राबवत आहे याबाबत तसेच शैक्षणिक कार्यक्रमाबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक कार्य देखील करत आहे याची माहिती सर्वांना मार्गदर्शनामध्ये दिली. संस्थेचे अध्यक्ष संदीप गावंड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की या शैक्षणिक साहित्याचा वापर शिक्षण घेत असताना चांगल्या परीने करावा.आमची संस्था हि विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार घेत असते पुढे देखील अशीच घेत राहील. तसेच विद्यार्थ्यांना जर शिक्षणात अडचणी येत असतील तर त्या दूर करू असे शब्द दिले.
या प्रसंगी श्री रामदास गवत्या गावंड सामाजिक संस्था आवरे संस्थेचे अध्यक्ष संदीप गावंड, केशव गावंड तसेच सर्व पदाधिकारी,माध्यमिक शाळेचे चेअरमन पी. एम. कोळी,प्राथमिक शाळेचे चेअरमन चंद्रकांत कोळी,माध्यमिक चे मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर, प्रभारी मुख्याध्यापक साईनाथ गावंड, सहाय्यक शिक्षक सुगिंद्र म्हात्रे,अनिल पाटील,मनोज म्हात्रे, स्वप्निल नागमोती,रोहिणी घरत, सुनीता पाटील, राणी कदम,सुप्रिया मुंबईकर, सत्यवान मर्चंडे,रुपाली चौधरी, कोल्हे मॅडम, शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाची सजावट घनश्याम म्हात्रे,दिनेश पाटील व ममता गवस यांनी केली.सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले.आभार सहाय्यक शिक्षिक सत्यवान मर्चंडे यांनी करून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 5 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे