समृध्दी महामार्गावर डिझेल चोरी करणारे पाच सराईत गुन्हेगार अटकेत 15,84,098/- रुपयाचा मुझेमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
विरेगाव/गणेश शिंदे दि.10
जालना जिल्ह्यातील महामार्गावर उभे असलेल्या वाहनातून डिझेल चोरी चे गुन्हे उघडकीस आणणे बाबत मा. पोलीस अधीक्षक मा. श्री. शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर खनाळ यांना सूचना दिल्या होत्या. त्यावरुन पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी पथक स्थापन करुन पथकातील अधिकारी व अंमलदार यांना डिझेल चोरी करणारे आरोपीतांची माहिती काढून त्यांचे वर कारवाई करणे बाबत बारकाईने सुचना व मार्गदर्शन केले होते.
त्या अनुषंगाने दिनांक. 8 आक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार हे डिझेल चोरी करणारे आरोपीतांची माहीत घेत असतांना बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, इसम नामे राहुल राजुभाऊ कदम रा.रामनगर साखर कारखाना हा त्याचे साथीदारा सह मागील काही दिवसापासुन त्याचे कडील एका वरना कार च्या मदतीने समृध्दी महामार्ग व इतर ठिकाणा हुन उभे असलेल्या वाहनातून डिझेल चोरी करत असल्याची माहिती मिळाली त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा जालना येथील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी सापळा लावुन आरोपी नामे 1.) राहुल राजुभाऊ कदम वय 27 वर्षे, रा. रामनगर साखर कारखाना, 2) प्रशांत गणेश गायकवाड वय 23 वर्षे, रा. कोळघर शेकटा, ता. जि. छत्रपती संभाजीनगर हमु रामनगर झेंडा चौक मुकुंदवाडी छत्रपती संभाजी नगर, 3) बाळु दगडुबा खिल्लारे वय 27 वर्षे, रा. टाकळी बाजड ता. भोकरदन, 4) राजेंद्र सुरेश गवळी वय 27 वर्षे, रा. मुकुंदनगर छत्रपती संभाजीनगर 5) रवि ज्ञानेश्वर कदम वय 20 वर्षे, रा. जळगाव सोमनाथ ता. जि. जालना यांना ताब्यात घेऊन त्यांचे कडुन पोलीस ठाणे चंदनझिरा जालना येथे दाखल गुन्हा रजि नं 1) गुरनं 391/2023 कलम 379 भादंवि 2) गुन्हा रजि नं 380/2023 कलम 379 भादंवि असे दोन गुन्हे उघडकीस आणले आहे. नमुद आरोपीतांकडुन गुन्हे करण्यासाठी वापरलेली कार व लोडिंग वाहना सह चोरी केलेले 97 लिटर डिझेल व इतर साहित्या असा एकूण 1584098/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास चंदनझिरा जालना पोलीस करीत आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर खनाल, सहायक पोलीस निरीक्षक श्री आशिष खांडेकर, पोलीस उप निरीक्षक श्री. राजेंद्र वाघ, पोहवा सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, संभाजी तनपुरे, भाऊराव गायके, विनोद गडधे, गोपाल गौशिक, रमेश राठोड, कृष्णा तंगे, रुस्तुम जैवाळ, जगदीश बावणे, दिपक घुगे, प्रशांत लोखंडे, सचिन चौधरी, लक्ष्मीकांत आडेप, आकर धांडगे, कैलास चेके, रवि जाधव, किशोर पुंगळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली