pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

संभाजीनगर येथील मूल्यसंस्कार मेळाव्यास हजारो नागरिकांची उपस्थिती

विविध विषयांवर उभारलेली ज्ञानदालने प्रमुख आकर्षन.

0 1 7 4 1 4

छ.संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.26

26 नोव्हेंबर 2023 रोजी संभाजीनगर येथे आयोजित असलेल्या मूल्यसंस्कार मेळावा व मातृपपितृपूजन सोहळ्यास उत्साहपूर्ण वातावरणास सुरवात झाली. मूल्यसंस्कार विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या विविध विषयावरील ज्ञानदालनांचे गुरुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा, गुरुपुत्र आदरणीय श्री नितीन भाऊ, आदरणीय आमदार श्री संजय शिरसाठ, आदरणीय आमदार श्री प्रशांत बंब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उदघाटन झाले.
या दोन दिवसीय उपक्रमाची सुरुवात संदेश यात्रेने झाली ज्यामध्ये हजारो महिला व मुलांनी सहभागी घेतला. समाज प्रबोधन करणारे संदेश हातामध्ये घेवून ही संदेश यात्रा कार्यक्रम स्थळी दाखल झाली. मूल्यसंस्कार दालनाचे उद्घाटन संपन्न झाल्यानंतर त्यांना आदरणीय श्री चंद्रकांत दादा यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.पालकांच्या पाल्यांविषयी असणाऱ्या सर्व प्रश्न/समस्या/शंकाचे निरसन करणाऱ्या “मूल्यसंस्कारातून पालक व पाल्य सुसंवादाकडे” या महत्वपूर्ण सेशन संपन्न झाले ज्यास हजारो नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवांसाठी स्वयंरोजगार विभाग अंतर्गत 70 पेक्षा जास्त कंपनी/संस्थांच्या माध्यमातून नोकरी संधी उपलब्ध करून देण्यात आल्या यामधून हजारोंच्या संख्येत युवक-युवतींना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने भेट दिली व तिथे उपस्थित असलेल्या सर्व करण्यासाठी आपण होणे त्यासाठी सबरदारी घ्यायची आहे
कार्यक्रमस्थळी ऋषी-मुनींचे वेद- विज्ञान संशोधनाचे सादरीकरण, सात्विक आहार, निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन, युवकांच्या व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा, करियर ,नोकरी बाबत अचूक मार्गदर्शन, सण-वार- व्रत-वैकल्यांबाबत भारतीय आणि वैज्ञानिक सादरीकरण दुर्गसंवर्धन कार्य आणि इतिहासामधील शस्त्रांचे प्रदर्शन, पारंपरिक खेळांचे महत्त्व आणि सादरीकरण, मुलांचा सर्वांगीण आणि पंचेंद्रिय विकासावर मार्गदर्शन, आजीबाईच्या बटव्याचे महत्त्व भारतीय कायद्यांची माहिती, सेवा मार्गातील सामाजिक उपक्रमांचे सादरीकरण व मांडणी अशी अनेक वैविध्यपूर्ण ज्ञानदालन सर्वांसाठी आकर्षक ठरत आहेत.
अयोग्य जीवनशैली व योग्य समुपदेशनाच्या अभावामुळे विविध प्रकारच्या संतती विषयी समस्या झाल्या असून त्यावर अभ्यासपूर्ण विश्लेषण तथा मार्गदर्शन करणाऱ्या “वंध्यत्वातून मातृत्वाकडे” या विषयावर तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभले.
सायंकाळी 5 वाजता गुरुपुत्र श्री आबासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तुलसी विवाह सोहळा संपन्न झाला. भारतीय संस्कृतीमध्ये असलेल्या विवाह संस्काराचे महत्व विशद करताना अनेक महत्वपूर्ण विषयावर आदरणीय श्री आबासाहेब यांचे मार्गदर्शन संपन्न झाले.या ज्ञान दालनास हजारो नागरिक भेट देत असून दिनांक 27.11.23 रोजी हे ज्ञान दालन सुरू राहणार असून अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ
गुरुपीठाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मात्र पितृ पाद्यपूजन सोहळा संपन्न होणार आहे. या अभूतपूर्व सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन मूल्य संस्कार विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

3.7/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे