कुणबी मराठा ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी दत्तात्रय अनंतवार यांचा उपोषणाचा यल्गार
कवाना येथील उपोषणाने तालुक्यातील ओबीसी समाज एकवटला

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.22
बीपी मंडल आयोगाच्या सर्वेक्षणात मराठा हा समाज भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १५ (४) प्रमाणे सामाजिक व शैक्षणिक मागास आढळून आलेल्या नसून केवळ इसवी सन १९६७ पूर्वी आणि निजाम कालीन दस्तऐवजांमध्ये त्यांचे सामाजिक नाव कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी होते. या आधारावरून त्यांना देण्यात आलेले व दिले जाणारे ओबीसी प्रमाणपत्र यापुढे न देता मागील काळात दिलेले सर्व प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे. यासह आरक्षण विषयक विविध विषयांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अमरण उपोषणा दरम्यान निर्माण होणा-या परीस्थीतीतीला राज्य शासन स्वत जबाबदार असेल असा लेखी निवेदनातून इशारा देत आपल्या मागण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय पांडुरंग अनंतवार कवानकर यांनी उपोषणाचा एल्गार पुकारत हे आपल्या हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण माघार घेणार नाही अशी भुमिका घेत आज सोमवार बावीस जुलै रोजी त्यांच्या अमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे.त्यांच्या उपोषणाला तालुक्यासह आजुबाजुच्या तालुक्यातील ओबीसी समाज बांधव उपोषण स्थळी भेट देऊन पाठींबा देत आहेत.उपोषणाने तालुक्यातील ओबिसी समाज एकवटत आहेत.