मोदी @९ महा-जनसंपर्क अभियानांतर्गत टिफीन बैठक भाजपा नेते सतीश घाटगे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार..
मोदी सरकारची ९ वर्षे सक्षम भारताची,विकसित राष्ट्राची निर्मिती..

वडीगोद्री/तनवीर बागवान, दि.19
अंबड तालुक्यातील साडेगाव येथे देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाली.या नऊ वर्षाच्या काळात सरकारने राबविलेल्या जनकल्याणकारी योजनांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी भाजपाच्यावतीने महा-जनसंपर्क अभियान राबविले जात आहे.यानिमित्ताने शेतात डब्बा बैठक मोठ्या उत्साहात साजरी झाली.
मोदी @ ९ या अभियानाअंतर्गत भाजपा नेते तथा समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतिश घाटगे व युवा नेते विश्वजीत दादा खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत साडेगाव येथील कार्यकर्ते विलास होंडे यांच्या शेतातरन निवासस्थानी टिफीन (डब्बा) बैठक उत्साहात झाली.या बैठकीत उपस्थित परिसरातील कार्यकर्त्यांना मोदी सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली.त्यानंतर सतिश घाटगे व विश्वजित खरात यांनी कार्यकर्त्यांसोबत पंगतीत बसून वनभोजन केले.
यावेळी तालुका अध्यक्ष शिवाजी बोबडे,पुरुषोत्तम उढाण,विठ्ठल सुडके, अभिजीत उढाण,विलास होंडे,भगवान बर्वे,कांताबापू उडदंगे,बंडू मुंढे,संतोष कव्हळे,शिवाजी मोरे,हनुमान आर्दड,बाबा उढाण,राहुल कणके,विकी शिंदे,पांडुरंग सुडके,योगेश पाचुंदे,ईश्वर धाईत,बाळासाहेब नाझरकर,पांडुरंग खोजे,प्रेमानंद उढाण,पांडू मुळे,आप्पासाहेब शिंदे,मनोज खरात,रामेश्वर जाधव,अनंत कुरे,रामेश्वर गरड,योगेश देशमुख,बालाजी खोजे,गावकरी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.