ब्रेकिंग
पोलिस मुख्यालयातील कामांचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते लोकार्पण
0
3
2
1
7
5
जालना/प्रतिनिधी,दि.15
जालना पोलिस मुख्यालयाच्या आतील व कवायत मैदान नुतनीकरण तसेच विद्युत पथदिवे या कामाचे लोकार्पण राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज पोलिस कवायत मैदानावर पार पडले.
यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
0
3
2
1
7
5