संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.20
सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने संत निरंकारी चारिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून आणि संत निरंकारी रक्तपेढी विलेपार्ले यांच्या व्यवस्थापना अंतर्गत सकाळी ९ ते १ या वेळेत सेक्टर १९ या विभागात संत निरंकारी सत्संग भवन उरण हनुमान कोळीवाड़ा या ठिकाणी भव्य रक्त दान शिबीर आयोजन करण्यात आला. सेक्टर संयोजक दत्ता पाटील, मेडिकल इन्चार्ज मारुती कासारे यांच्या मुख्य उपस्थितीत कार्यक्रमाचे उदघाटन झाले.मुखी अनंत शेणाय, मुखी समिर पाटील,मुखी रोशन घरत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सोबतच सेक्टर मधील सेवादल अधिकारी यांची ही उपस्थिती मोठया प्रमाणात होती.१५० रक्तदात्यांनी यात सहभाग घेतला होता. तर सुमारे ६० युनिट रक्तपेढीत रक्त जमा झाले. रक्तदाता आणि डॉक्टर स्टाफ, मेडिकल कर्मचारी आणि निरंकारी सेवादल यांचा उत्साह सेवेतून जाणवत होता. युनिट नं ५८३ उरण हनुमान कोळीवाड़ा यांनी सर्व व्यवस्था सुंदर रित्या पार पाडली.सर्वांच्या मौल्यवान सहकार्याने शिबीर सुंदर रित्या पार पडले.