मन की बात हा विशेष कार्यक्रम 31ऑगस्ट रोजी होणार प्रसारित
छ. संभाजीनगर /आनिल वाढोणकर,दि 25
देशाचे लोकप्रिय व लाडके पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी हे “मन की बात” या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे देशवासियांशी थेट संवाद साधत आहेत. समाजातील विविध घडामोडी, प्रेरणादायी कथा तसेच देशहिताच्या संकल्पना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य “मन की बात” या माध्यमातून यशस्वीरित्या होत आहे.
आगामी १२५ वा “मन की बात” संवाद रविवार, दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ठिक ११.०० ते ११.३० या वेळेत देशभरातून थेट प्रक्षेपित होणार आहे.या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नागरिकांनी आपल्या टीव्ही, मोबाईल किंवा विविध माध्यमांद्वारे मोठ्या संख्येने ऐकावे, असे छत्रपती संभाजीनगर भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. संजयजी खंबायते यांनी आवाहन केले आहे.
यावेळी बोलताना श्री. खंबायते साहेब म्हणाले की,
“मन की बात” हा फक्त संवाद नसून देशातील प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे. राष्ट्रनिर्मितीमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा असून, देशहितासाठी जनसहभाग आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने हा कार्यक्रम नक्की ऐकावा व देशाच्या प्रगतीस हातभार लावावा. चला, आपण सर्वांनी कुटुंबासह हा प्रेरणादायी संवाद ऐकून पंतप्रधान मोदीजींच्या विचारांशी जोडले जाऊया.
