pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पीसीपीएनडीटी ॲक्ट अंतर्गत जिल्हा सल्लागार समितीची बैठक

0 1 1 8 2 2

जालना/प्रतिनिधी,दि.6

जालना जिल्ह्यात बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान व गर्भपात होत असल्यास नागरिकांनी 18002334475 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून माहिती उपलब्ध करुन द्यावी. प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान करणे हे पीसीपीएनडीटी कायद्यानूसार गुन्हा असून अशा प्रकारचे कृत्य दिसून आल्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीस खबऱ्या बक्षीस‍ योजनेअंतर्गत 1 लाख रुपयांपर्यंत बक्षीस देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.  प्रताप घोडके यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात पीसीपीएनडीटी ॲक्ट-1994 अंतर्गत जिल्हा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी समितीच्या अध्यक्षा डॉ.सरोज घोलप व सदस्य डॉ.स्मिता गावडे, डॉ.सुरजित अंभोरे, ॲड. इंगळे, श्रीमती संगिता गायके,  श्रीमती मंजूषा काकडे,  श्रीमती प्रतिभा मसावले, डॉ.व्ही.डी.वाकोडे, विधी सल्लागार ॲङ सोनाली कांबळे यांची उपस्थिती होती. या बैठकीत एकुण 2 प्रस्ताव ठेवण्यात आले. यामध्ये  डॉ. प्रियदर्शनी काकड यांचा जालना येथील अग्रसेन नगरातील श्री.विनायक हॉस्पिटल येथील सोनोग्राफी केंद्रासाठी नवीन  प्रस्ताव  तर डॉ. अनिल शिंदे यांचा भोकरदन नाका येथील सोनोग्राफी केंद्राचा नुतनीकरणाअंतर्गत पुर्ननोंदणीसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 2

Related Articles