जालना व्यापारी महासंघाच्या स्नेहसंमेलन मध्ये टेंभुर्णी चे व्यापारी रामप्रसाद बारगुडे यांचा विशेष सत्कार. प्रमाणपत्र देऊन केला सत्कार.

जाफराबाद/विशाल देशमुख,दि 29
व्यापारी महासंघ जिल्हा जालना
जनरल मर्चंट्स असोसिएशन द्वारा आयोजित कार्यकमात टेंभुर्णी येथील तरुण व्यापारी
श्री रामप्रसाद बारगुडे यांचा प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
जीवन जगणं निरस नाही, परंतु जीवनात आदर्श निर्माण करणे एक मोठी साध्यता आहे.
आपण उद्योग, व्यवसाय क्षेत्रात जन मानसासाठी त्यांच्या अडी-अडचण, हितासाठी व एकजुटी करण्यासाठी आणि संघटनेच्या हितात उत्कृष्ट कार्य केले आहे. निःस्वार्थपणे सेवा देऊन ग्राहकांना, गरजूंना मानव सेवकाच्या रूपाने उत्कृष्ट कार्य केले आहे.
आपण केलेले कार्य समाजासाठी, व्यापार जगताच्या हितात कायम असून अभिनंदनीय आहे. म्हणून आपल्या मान्यवरांच्या हस्ते “उत्कृष्ट /आदर्श” कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
असा मचकूर या प्रमाणपत्रात करण्यात आला आहे.हे प्रमाणपत्र जालना जिल्हाधिकारी व कार्यक्रम चे उदघाटक जालना जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी श्रीमती आशिमां मित्तल श्री अजयकुमारजी बंसल
जिल्हा पोलीस अधीक्षक जालना विशेष तसेच कार्यक्रम अध्यक्ष व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री हस्तीलमल बंब श्री सतीश पंच यांच्या प्रमुख उपस्थिती देण्यात आले.
या वेळी टेंभुर्णी हून रामप्रसाद बारगुडे यांच्या सह बद्रीप्रसाद अग्रवाल ज्ञानेश्वर डोमाळे गणेश चांदोडकर सचिन गायमुखे नंदकिशोर बोराडे दिनेश जोशी नारायण धनवई हे व्यापारी उपस्थित होते.त्यांना भेटलेल्या या पुरस्कार बद्दल टेंभुर्णी व्यापारी महासांच्या वतीने अलकेश सोमाणी धीरज काबरा संजय बोडखे रामू पन्हाळकर कल्पेश सोमाणी शिवराज सपाटे सुरज जांगिड गोपाल बांगड सय्यद मोहियीद्दीन शंकर मुळे प्रदीप काबरा अतुल बूजाडे सुभाष काबरा अर्जुन कुमकर आदी व्यापारी मंडळी ने त्यांचे अभिनंदन केले.

