पिंपळगाव रेणुकाई येथे विज पडून कोठाकोळी येथील दोन तरुण ठार.एक जखमी..

भोकरदन/प्रतिनिधी, दि.19
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई शिवारात शेतात काम करीत असताना विज कोसळुन दोघे जण जागीच ठार झाले तर एक जण जख्मी झाला असल्याची घटना भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई शिवारात घडली आहे.सदर घटनेत मृत झालेल्या तरुणांचे नाव गणेश प्रकाश जाधव(३५) सचिन विलास बावस्कर (२८) तर जख्मी मधील प्रंशात रमेश सोनवणे याला पुढील उपचारासाठी सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात भरती केले आहे कोठाकोळी येथील हे तिघेही तरुण सकाळी कामानिमित्त पिंपळगाव रेणुकाई येथे आले होते.दुपारी वीजेच्या कडकडाटासह रिमझीप पावसाला सुरूवात झाली.माञ यामध्ये अचानक विज कोसळून गणेश जाधव व सचिन बावस्कर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर जख्मी प्रंशात सोनुने हा गंभीर जख्मी झाला.मृतांना पिंपळगाव रेणुकाई येथील सरकार दवाखान्यात श्वविच्छेदनसाठी पाठविण्यात आले.घटनेतील मृत हा विवाहीत असुन त्याच्या पाश्चात पत्नी मुलगा,मुलगी असा परिवार आहे तर सचिन बावस्कर हा तरुण अविवाहित आहे…