ब्रेकिंग
उलवे नोड मधील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची मागणी.

0
3
1
0
3
5
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.4
सक्रिय,कार्यतत्पर व संवेदनशिल कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी सुप्रिटेंड इंजिनीयर व सिडको अधिकारी यांच्या समवेत उलवे नोड मधील रस्त्यांची पाहणी केली. गणपती सण दोनदिवसांवर येवून ठेपला असतांना सर्व सामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दुरावस्था झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी सिडको अधिकारी व सुप्रिटेंड इंजिनीयर यांच्या कडे केली आहे. यावर सिडको अधिकारी व सुप्रिटेंड इंजिनिअर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच युद्ध पातळीवर खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात येईल असे शासकीय अधिकाऱ्यांनी महेंद्र घरत यांना आश्वासित केले.
0
3
1
0
3
5