बजाजनगर येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा संपन्न

छ.संभाजीनगर/अनिल वाढोणकर,दि.18
दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे पिठाधिश गुरुवर्य प. पू. गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने व गुरूपुत्र आदरणीय नितीनभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली बजाजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सेवा मार्गाच्या वतीने सत्कार करण्यात येतो.* सत्काराच्या माध्यमातून मिळालेली शाबासकीची थाप विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी उत्साहवर्धक ठरत असते.याच परंपरेला अनुसरून शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मधील दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांना गुरुवर्य प. पू. गुरुमाऊलींच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गरूडझेप करीअर अकॅडमीचे संस्थापक प्रा. डॉ. एस. एस. सोनवणे व गंगापूर तालुक्यातील सिध्दनाथ वाडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.शिवाजी ढाकणे साहेब यांची विशेष उपस्थिती होती.प्रा. डॉ. एस. एस. सोनवणे यांनी मुलांना आई आणि वडील यांचे आयुष्यातील महत्व पटवून देत शिक्षणाच्या सोबत अध्यात्म व संस्काराचा वसा घेत पुढील वाटचाल करण्याचा सल्ला दिला. तसेच आजच्या काळात सुसंस्कृत विद्यार्थी व सजग नागरिक आपल्या पाल्याला बनवायचे असेल तर प्रत्येक घरात आई जिजाऊ सारखे संस्कार माता भगीनींनी अगदी गर्भावस्थेपासून पाल्यावर करणे गरजेच आहे अशी भावना श्री. शिवाजी ढाकणे यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केली. दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून २०% अध्यात्म आणि ८०% समाजकार्य या उक्तीप्रमाणे युवतींना स्वसंरक्षणासाठी मोफत लाठीकाठी प्रशिक्षण २३ मे २०२३ ते १२ जून २०२३ या काळात देण्यात आले होते. या प्रशिक्षणात पूर्णवेळ सहभाग नोंदविलेल्या युवतींना गुरूवर्य प. पू. गुरुमाऊलींच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.