pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

प्लेसमेंट ड्राईव्ह जागेवरच निवड संधी; रोजगार मेळाव्यात 50 उमेदवारांची निवड

0 1 7 3 7 3

जालना/प्रतिनिधी,दि.13

सामाजिक न्याय पर्वानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना आणि समाज कल्याण कार्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्लेसमेंट ड्राईव्ह जागेवरच निवड संधीचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन , सांस्कृतिक सभागृह, जालना येथे करण्यात आले होते. या जागेवर निवड संधी रोजगार मेळाव्यात 50 उमेदवारांची निवड करण्यात आली. अशी माहिती कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त संपत चाटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये 78 उमेदवारांनी सहभाग नोंदवून 3 नियोक्त्याकडे मुलाखती दिल्या. यामधून 50 उमेदवारांची निवड करण्यात आली. या प्लेसमेंट ड्राईव्ह कार्यक्रमाचा शुभारंभ समाज कल्याणचे सहायक आयुक्त अमित घवले यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आला. उपलब्ध झालेल्या रोजगार संधीचा लाभ घेवून आपल्या पहिल्या करिअरची सुरूवात करावी, किती वेतन मिळणार हे न पाहता प्रथम नोकरी संधी साधावी आणि अनुभव प्राप्त करून आपले करिअर बनवावे असे आवाहनही त्यांनी केले. नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक – युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. यावेळी विक्रम टी प्रोसेसर प्रा. लि. बोरखेडी यांनी १२ , फुलंब्री टेक्स्ट कॉम प्रा.लि. यांनी 13 आणि टॅलेंसेतु सर्व्हिसेस प्रा. लि. पुणे यांनी 25 अशी एकूण 50 उमेदवारांची निवड केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माहिती कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त संपत चाटे यांनी केले तर सुत्रसंचालन सुरेश बहुरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी करण्यासाठी अमोल बोरकर, कैलास काळे, दिनेश उढाण आणि सोमेश्वर शिंदे यांनी परिश्रम घेतले. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे