pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

0 4 1 0 9 0
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.23

जाफराबाद येथील
सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जाफराबाद येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. श्याम सर्जे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपप्राचार्य डॉ. श्याम सर्जे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन व समाजप्रबोधनाच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजसेवेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी प्रो. डॉ.एस आर पहारे,महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.अनिल वैद्य तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. जगतवाड एस. पी. यांनी केले. तर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. सरिता मणियार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 0 9 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे