भाजपा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांची ट्विटर पोस्टद्वारे मानहानी व बदनामी केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा-सौ संध्या संजय देठे

जालना/प्रतिनिधी, दि.10
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांची आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर पोस्टद्वारे मान आणि व बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करणे बाबतचे निवेदन, मा, जिल्हा पोलीस अधीक्षक जालना यांना, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जालन्याचे वतीने देण्यात आले आहे,
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्राच्या वतीने जिथे जिथे महिलांना वर अन्याय अत्याचार होतो तिथे आवाज उठवून त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न व काम प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वात सक्षम पणे चालू आहे, असे असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चित्राताई यांच्या विषयी आक्षेपहार्य मानहानी व बदनामीकारक असे ट्विट करून त्यांचे चारित्र्य हरण व बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे, राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जाण्याचे प्रकार हे कदापि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सहन करणार नाही,
म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी ,
अशी मागणी प्रदेश निमंत्रित सदस्य तथा मा,नगरसेविका सौ संध्या संजय देठे यांनी केली आहे ,त्यांच्या समवेत निवेदनावर सौ शुभांगी ताई देशपांडे जिल्हाध्यक्ष भाजपा सांस्कृतिक सेल कु शर्मिष्ठा कुलकर्णी मराठवाडा युवती अध्यक्ष ,
सौ अरुण जाधव जिल्हा उपाध्यक्ष मा,नगरसेविका
सौ वंदना ढगे भारतीय जनता महिला मोर्चा
सौ वैशाली बनसोड भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, आदींच्या साक्षरी आहे