पळसा येथे शासन आपल्या दारी उपक्रमाला चांगला प्रतिसाद

हदगाव/ प्रभाकर डुरके,दि.3
पळसा येथील सामाजिक कार्यकर्त्या सवीताताई विनोद निमडगे यांनी महसूल मंडळात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मौजे पळसा येथे सर्व सामान्यांचे प्रश्न एकाच वेळी एकाच ठिकाणी मार्गी लावण्यासाठी फायदेशीर ठरलेला शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्याची मागणी तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी जिवराज डापकर यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करून एकतीस मे रोजी पळसा येथे शासनाच्या आदेशानुसार पळसा येथे शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन केले . आमदार माधवराव पाटील जवळगावकर, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, तहसीलदार जिवराज डापकर, यांच्या सह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित राहुन उपस्थितांना अडीअडचणी जाणून घेत सोडविण्यासाठी जागेवरच निपटारा केला असल्याने पळसा सह महसूल मंडळातील शेतकरी नागरिक महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाधान व्यक्त केले.
यावेळी गट विकास अधिकारी डि.के.अडेराघो, कृषी अधिकारी आर.डी.रणवीर, तालुका कृषी अधिकारी पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखेडे, गटशिक्षणाधिकारी किशनराव फोले, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष शेकडे, नायब तहसीलदार चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ एस बी भिसे,मंडळ अधिकारी गिते, ग्रामसेवक कुणाल मांजरमकर, तलाठी हंबर्डे मॅडम, तलाठी बि.यु.ईप्पर, कृषी सहायक बि.एन.संगेवार,एम.बी.शेवाळकर,काटेवार,आढाव,नरमुलवाड, भिसे, प्रशांत सूर्यवंशी, कृषी पर्यवेक्षक जाधव,खरात,चंगल, यांच्या सह सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी पळसा सह परीसरातील आजी माजी सरपंच उपसरपंच पोलिस पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते सुत्रसंचलन सादुलवार यांनी केले.तर कार्यक्रमाचे आयोजन सवीताताई विनोद निमडगे यांनी केले.तर नियोजन प्रशासनाने केले.