pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भूमिपुत्रांसाठी सुसज्ज हॉस्पिटल व भूमिपूत्र भवन उभारावे !गोपाळ पाटील यांची मागणी.

0 3 8 3 5 2

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18

उरण तालुक्यातील स्थानिक भूमिपूत्र शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने संपादीत करून शासनाने अनेकांना भूमिहीन केले आहे. मात्र या जमिनीवर मोठ्या प्रमाणात विकास होत असताना उरणच्या स्थानिक भूमिपुत्रांना आरोग्य व सामाजिक सुविधा अद्यापही मिळालेल्या नाहीत, त्यां मिळण्यासाठी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी सिडकोकडे मागणी केली आहे.

सन २००६ साली तत्कालीन आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या उपस्थितीत व भाजपा शिवसेना युतीच्या काळात उरणमध्ये एका सुसज्ज हॉस्पिटलसाठी सिडकोने निर्धारीत केलेल्या भूखंडावर भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर ४ ऑगस्ट २०२४ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेसुद्धा त्याच निर्धारीत भुखंडावर पुन्हा एकदा हॉस्पिटलचे भूमिपूजन पार पडले.परंतु आज १५ वर्ष उलटूनही त्या जागेवर एक विटही रचण्यात आलेली नाही. ही बाब अत्यंत दुःखद व निराशाजनक आहे. तरी सिडकोने हॉस्पिटलसाठी केलेल्या जागेवर स्वतः सिडको व्यवस्थापनाने आर्थिक तरतूद करून इमारत उभी करावी. तसेच आर्थिक तरतुदीसह भूमिपूत्र भवनासाठी जागा निश्चित करून भूमिपूत्र भवनसुद्धा उभे करावे व स्थानिक भूमिपुत्रांना काही अंशी न्याय द्यावा, अशी मागणी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी सिडकोकडे केली आहे.याबाबत त्यांनी विविध ठिकाणी पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुद्धा केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 3 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे