गजानन ट्रेडर्सचे सर्वेसर्वा युवा उद्योजक चेअरमन नारायण जाधव यांचा संघर्षमय जीवन प्रवास
शेतकरी,दूध विक्रेता, ते युवा उद्योजक म्हणून क्रेझ

पाटोदा/नितिन भोंडवे,दि.24
प्रत्येक यशस्वी माणूस हा सहजरित्या नामांकित होत नसतो त्याच्या दैनंदिन जीवनात अनेक अडचणी संघर्ष येत असतात परंतु त्या संघर्षातून वाट काढून आपले जीवन यशस्वी कसे बनवायचे याचे उत्तम उदाहरण म्हणजे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामध्ये डोंमरी तलावाच्या शेजार छोटसं उखंडा गावातील रहिवासी गजानन ट्रेडर्स चे सर्वेसर्वा चेअरमन नारायण जाधव आहेत.
उखंडा गावाची पार्शभुमी पाहिली तर गावाच्या ठिकाणी डोंमरी तलाव करण्यात आला त्यामुळे गाव तीन ठिकाणी विभागले गेले, तलावात जमिनी गेल्या ,त्यामुळे अनेक कुटुंबासमोर उपजिवेकाचा प्रश्न निर्माण झाला.आणि अनेकांना व्यवसायाकडे वळावे लागले. त्यांच्या कुटुंबामध्ये वडील अंकुश जाधव,आई,सिधुबाई.भाऊ – राजेंद्र , शामसुंदर. नारायण असे त्यांचे कुटुंब होते.त्यामध्ये नारायण जाधव हे मोठे आसल्यामुळे त्यांच्यावर कुटुंबाची, लहान भावाच्या शिक्षणाची जबाबदारी आली. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांचे आई वडील ऊस तोडणी साठी बाहेर गावी जात होते. तेव्हा त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला .नंतर त्यांनी लिंबादेवी चौकात दूध डेयरी सुरू करून त्यांना त्यामध्ये विस्तार केला.प्रामाणिकपणा,लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना मदत करणे, ह्या तत्त्वावर त्यांनी नवीन व्यवसायात भर करून नंतर हळुहळू त्यांनी भुसार माल घेण्यास सुरुवात केली. आज त्यांची ती सुरुवात एका उत्कृष्ठ उद्योजकांमध्ये झाली आहे. तालुक्यात नव्हे पूर्ण जिल्ह्यामध्ये गजानन ट्रेडर्स म्हणून त्यांची ओळख आहे.आणि त्यांच्या मेहनती कडे पाहत त्यांचे भाऊ राजेंद्र जाधव हे आज महापरेशन मध्ये सीनिअर ऑपरेटर आहेत,तर दुसरे बंधू जनतेची सेवा करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस आहेत. नारायण जाधव यांनी लिंबादेवी सारख्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी भुसार माल खरेदी विक्री,सिमेंट,लोखंड अश्या सर्व सुविधा उपलब्ध करून लोकांची धावपळ थांबवण्याच काम केलं आहे.अश्या बीड जिल्ह्यातील युवा उद्योजकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……!!