pub-7425537887339079
ब्रेकिंग

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उरण तालुका – नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची घेतली सदिच्छा भेट.

0 4 2 5 7 9
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.10

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अंगीकृत संघटना असलेल्या शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष उरण तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी मनोहरशेठ भोईर (रायगड जिल्हाप्रमुख व माजी आमदार)यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.या भेटीवेळी जिल्हा कार्यालयीन चिटणीस ओमकार विजय घरत, कक्ष उरण तालुका संघटक कुणाल अशोक पाटील, कक्ष उरण शहर प्रमुख संदीप जाधव तसेच इतर सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व पदाधिकाऱ्यांचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे आणि नगरपालिकेतील गटनेते अतुल ठाकूर यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.ओमकार विजय घरत – कक्ष जिल्हा कार्यालय चिटणीस, रायगड,कुणाल अशोक पाटील – कक्ष तालुका संघटक उरण,संदीप जाधव – कक्ष उरण शहर प्रमुख, उरण, फतेह खान – शहर उपकक्ष प्रमुख उरण,आकाश तेलंगे – शहर उपकक्ष प्रमुख, उरण,सचिन कदम – कक्ष कामठा विभाग प्रमुख, कामठा, तेजस म्हात्रे – द्रोणगिरी शहर प्रमुख, द्रोणगिरी, संदेश पाटील – द्रोणगिरी उपशहर प्रमुख, द्रोणगिरी, सायरस डिसूझा – जिल्हा परिषद कक्ष प्रमुख, चाणजे,अमित पाटील – नवघर जिल्हा परिषद कक्ष प्रमुख, नवघर,हृतिक पाटील – नागाव पंचायत समिती कक्ष प्रमुख, नागाव, रोशन पाटील – केळवणे जिल्हा परिषद कक्ष प्रमुख, केळवणे,चेतन माळी – जिल्हा उपकक्ष प्रमुख, चाणजे आदी नवनिर्वाचित पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.ही भेट उरण तालुक्यात ग्राहक हक्कांसाठी प्रभावी कार्य आणि संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण ठरली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे