डुकरी पिंपरी येथे राजर्षी छञपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी…!

जालना/प्रतिनिधी, दि.26
जालना जिल्हातील चक्रवती सम्राट अशोक शिक्षण संस्था नजिक पांगरी संचलित राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी,ता.जि.जालना या शाळेत
आरक्षण देणारा पहिला राजा…जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना१ रु, दंड ठोकणारा राजा…कला संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा…अंधश्रद्धा, कर्मकांडे, दैववादयावर प्रहार करणारा राजा…डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा..सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा..म्हणजे छत्रपती शाहू महाराज…२६ जुन शाहु महाराजांचा जन्मदिवस म्हणजेच “सामाजिक न्याय दिवस”… रयतेचा राजा शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त विंनम्र अभिवादन व कोटी कोटी त्रिवार वंदन तसेच जयंती निमित्त शाळेत राजर्षी छञपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व शाळेचे मुख्याध्यापक सी.जी.वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.शाळेचे सहशिक्षक डी.एन. सोनकांबळे यांनी प्रास्तविक केले.विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तसेच शाळेत मुख्याध्यापक यांच्या हस्ते पुस्तक वाटप करण्यात आले.तसेच व वृक्षरोपन करणात आले.यावेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक सी.जी.वाघमारे.व उपस्थित शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद
श्रीमती.एस.आर.कुलकर्णी,वाय.बी.मदन,डी.एन.सोनकांबळे,पी.पी.नागरे,श्रीमती.ए.बी.देशपांडे,एल.बी.जाधव,आर.एस.ठाकरे,एस.बी.राऊत,श्रीमती.एम.ए.खरात,आदिची उपस्थिती होती.
शाहू महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या