pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उलवे मध्ये नागरी आरोग्य केंद्र सुरु करण्याची मनसेची मागणी.

0 3 2 1 6 3

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.16

महाराष्ट्र नवनिर्माण सेना उलवे नोड गव्हाण विभागातील पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने पाठपुरावा चालु आहे की उलवे नोड मध्ये नागरी आरोग्य केंद्र चालु करण्यात यावे व खाजगी रुग्णालया कडुन होणारी नागरिकांची आर्थिक लुट थांबावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उलवे शहर अध्यक्ष राहुल बाबुराव पाटील व पनवेल तालुका उपाध्यक्ष निर्दोष केशव गोंधळी यांनी काही दिवसा पुर्वी सिडको अधिकारी डाॅ बाविस्कर व पनवेल आरोग्य केंद्र यांना निवेदन पण दिले होते. त्या अनुषंगाने आज पनवेल आरोग्य केंद्राचे अधिकीरी सुनील नखाते यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करण्यात आली. व लवकरात लवकर उलवे नोड मध्ये आरोग्य केंद्र ( हाॅस्पीटल) चालु करण्यात यावे असे स्मरणपत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
उलवे शहर अध्यक्ष राहुल बाबुराव पाटील ,
पनवेल तालुका उपाध्यक्ष निर्दोष केशव गोंधळी,उलवे गाव शाखा उपाध्यक्ष संदीप म्हात्रे व ॲड शुभम मढवी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे