pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

विशेष आर्थिक क्षेत्रातील जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याचे शरदचंद्र पवार यांचे आश्वासन.

0 3 2 1 8 2

उरण /विठ्ठल ममताबादे,दि.11

यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे उरण, पेण,पनवेल तालुक्यातील मे. मुंबई इंटीग्रेटेड एसईझेड लि. या कंपनीला मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमिन अधिनियम १९४८ चे कलम
६३/१अ अनुसार विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ )स्थापन करण्याकरीता दिलेल्या मे. विकास आयुक्त, (उद्योग) मुंबई यांचे परवानगी आदेशाचे कलम १ प्रमाणे शेतक-यांना जमीन मिळकती मूळ किंमतीस परत करण्याबाबत सरकारने आदेश दिले होते परंतु अद्याप पर्यंत त्याची कोणतीही अंमलबजावणी झाली नाही.याबाबत सेझग्रस्त शेतकरी चळवळ संघटना यांनी सरकार दरबारी वारंवार पाठपुरावा करून सुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही म्हणून शेतकऱ्यांच्या प्रमुख शिष्टमंडळानी महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक तथा राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांची भेट घेतली.यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळवून देण्याबाबत आपण सरकार दरबारी प्रयत्न करण्याचे आश्वस्त केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर,कोकण विभाग युवक अध्यक्ष प्रमोद बागल, गणेश नलावडे (नाना), उरण तालुका विधानसभा अध्यक्ष दत्तात्रेय नवाले (एडवोकेट),ज्ञानेश्वर रघुनाथ घरत (उरण अध्यक्ष ),हेमंत म्हात्रे (पेन अध्यक्ष ),आनंद रमेश ठाकूर (सचिव ),प्रभाकर अनंत मोकल (उपाध्यक्ष ),रामदास लखु दवई (सेक्रेटरी ),प्रदीप गजानन मोगल (खजिनदार) सुमित ज्ञानेश्वर घरात रोहित जगदीश ठाकुर शांताराम सांगू म्हात्रे रघुनाथ जोमा घरत गणेश पाटील उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे