भाटवडगाव मध्ये पारंपारिक पद्धतीने करण्यात आले गणेश विसर्जन

बीड/प्रतिनिधी,दि.28
माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव या गावामध्ये अतिशय आगळ्या वेगळ्या व पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जन करण्यात आले असून मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात झालेल्या अपुऱ्या पावसामुळे आज शेतकऱ्यांवर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीचे भान ठेवून भाटवडगाव येथील धाडस गणेश मंडळांने दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून व्यर्थ पैसा खर्च न करता गणेश विसर्जन पारंपारिक वाद्य ढोल ताशा व हलगीच्या गजरात बैलगाडीतून गणपतीची गावातून मिरवणूक काढून आनंदात गणेश विसर्जन करण्यात आले. तसेच गणेश मंडळांनी आकरा दिवस रोज सकाळी प्रसादाची व्यवस्था करून गावातील नागरिकांचा आनंद द्विगणित केला.
गावातून तसेच पंचक्रोशीतुन धाडस मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्यांसह धाडस गणेश मंडळाचे कौतुक केले जात आहे.
यावेळी गणपतीची मिरवणूक काढताना पोलीस बांधव, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील नागरिक व गणेश मंडळाचे सदस्य उपस्थित होते