pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र नागरी सेवा  संयुक्त पुर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू 

0 1 1 8 2 2

जालना/प्रतिनिधी,दि. 31

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा-2023, रविवार दि.4 जुन 2023 रोजी उपकेंद्रावर सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 3 ते 5 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. तरी परीक्षेच्या एकुण 6 उपकेंद्र  परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नन निर्माण होण्याची शक्यता असल्याने परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणेकामी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणुन फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी जारी केले आहेत.
नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा जालना येथील मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन  महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, अंकुशराव टोपे महाविद्यालय, जे.ई.एस. महाविद्यालय आणि श्री. सरस्वती भुवन प्रशाला माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कुल या परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा-2023 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परीक्षा केंद्राजवळ 100 मीटरच्या परिसरात सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी बुथ, फॅक्स, झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके परिक्षेच्या कालावधीत बंद ठेवण्यात यावे. अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या शक्तीचा वापर करुन वरील केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. आदेशाच्या अंमलबजावणीसाठी नोटीस देण्यचा पुरेसा कालावधी नसल्याने व परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्यादृष्टीने प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 (2) नूसार आदेश एकतर्फी काढण्यात आला आहे. याची जालना पोलिस अधीक्षकांनी ध्वनीक्षेपकाद्वारे प्रसिध्दी करावी, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 2